आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Get Married In One And Half Rupee At Shird Occasion Of Akshaytrutiya

अक्षयतृतीयेला शिर्डीत सव्वा रुपयात विवाह !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व दत्त धार्मिक ट्रस्ट इंदूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत येत्या अक्षय्यतृतीयेला २५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी वधू वरांकडून फक्त सव्वा रुपया घेतला जाणार आहे, अशी माहिती विवाह सोहळ्याचे आयोजक कैलास कोते यांनी दिली.

गरीब कुटुंबातील व्यक्तींना मदत म्हणून हे सामाजिक कार्य केले जाते. विवाह सोहळ्यात वधूवरांना आयोजकांकडून पाेषाख, मंगळसूत्र, संसारोपयोगी वस्तू, साईंची प्रतिमा देण्यात येते. याचबरोबर व-हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था करण्यात येते. यानिमित्त शिर्डीमधून उंट, घोडे व सजविलेल्या वाहनांतून वधूवरांची मिरवणूक काढण्यात येते. या साेहळ्यास ज्यांना सहभाग घ्यावयाचा असेल अशा वधूवरांनी शाळा सोडल्याचा दाखला, फोटो, रक्तगट अहवाल, रहिवासी कागदपत्रांसह संदीप डेरे (९८५०५०००८०), अनिल शेळके (९०९६१७४०५०), शफिक शेख (९७६३२९८७१२) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.