आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणांनी दणाणली घाटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटी रुग्णालयातील समस्यांमुळे मेटाकुटीस आलेल्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी तीव्र निदर्शने करून परिसर दणाणून सोडला. भीमशक्ती कर्मचारी संघटनेने भव्य बॅनर्ससह मोर्चा काढून ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुच्र्या सोडा’ अशा घोषणा देत अधिष्ठातांना निवेदन दिले. भरउन्हात झालेल्या या आंदोलनामध्ये सुमारे अडीचशे तरुण सहभागी झाले होते.

‘दिव्य मराठी’ने घाटी रुग्णालयातील समस्यांवर नुकतीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ही निदर्शने करण्यात आली. या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांना देण्यात आले. यानंतरही दुर्लक्ष केल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा या वेळी मराठवाडा प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पोहाल यांनी दिला. अभ्यागत समितीमध्ये केवळ राजकीय मंडळींचा भरणा असून त्यांना रुग्ण व कर्मचार्‍यांच्या प्रश्नांची जाणीव नसल्याने क्वचितच ते रुग्णालयांच्या प्रश्नांकडे लक्ष देतात. रुग्ण व कर्मचार्‍यांच्या समस्यांची जाणीव असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींना समितीवर घेण्याच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

खिसे भरण्यासाठी खासगीकरण केल्याचा आरोप
0 तीन वर्षांपासून कर्मचारी निवासस्थानांच्या समस्या कायम
0 निवासस्थान व परिसरातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
0 अनुकंपा व लाडपागे तत्त्वावरील चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त असूनही इतर उमेदवारांच्या भरतीचा घाट
0 प्रशासन कर्मचार्‍यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर
0 1800 खाटांची गरज असताना फक्त 1177 खाटा उपलब्ध. नादुरुस्त खाटांमुळे रुग्णांच्या नातेवाइकांचा रोष चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांवर
0 पदवी, पदव्युत्तर स्तरावरील जागा कमी असताना डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसमुळे रुग्णांची हेळसांड
0 सुमारे 1500 कर्मचार्‍यांची गरज, पण प्रत्यक्षात निम्मेच कर्मचारी
0 अनेक वर्षांपासून चतुर्थर्शेणी कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त असल्याने कामाचा अधिक ताण