आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घाटीतील कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटीतील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती न करताच सार्वजनिक बांधकाम विभागाने बिले उचलली. डीबी स्टारने हे प्रकरण उघड केल्यानंतर याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने केली आहे. घाटीचे अधिष्ठाता व बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी. पी. जोशी व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवांना महासंघाने दिले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांसाठी 1962 पूर्वी चुना व लोड बेअरिंगच्या पद्धतीने क्वार्टर्स बांधण्यात आले. त्यांचे ए वन, बी वन, सी वन, डी वन, जी वन आणि एच अशी विभागणी करण्यात आली. आता या सर्व क्वार्टर्सची अवस्था भयंकर झाली आहे. दारे-खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. ओटे खराब झाले असून रंगही उडून पोपडे निघाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत या घरांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 96 लाख 8 हजार 313 रुपयांचा प्रस्ताव अधीक्षक अभियंता यांच्या वित्तीय अधिकारात मंजूर करण्यात आला. या कामाची निविदा किंवा जाहिरात न काढताच परस्पर आपल्या जवळच्या मर्जीतील ठेकेदारांना कामे वाटप करण्यात आली. या ठेकेदारांनी निवासस्थानाचे कोणतीही कामे अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण न करता प्रमाणपत्र सादर करून बिलांची वसुली केली. याबाबत डीबी स्टारने 6 जून 2014 रोजी ‘निविदा नाही, कामेही केली नाहीत, खिसे मात्र भरले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.
जागेवर येऊन पाहणी करा
४अधिकार्‍यांमार्फत ठेकेदारांनी केलेल्या कामाची मुंबई येथील तज्ज्ञांकडून तपासणी केली जावी. बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि अधिष्ठाता तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांनी केलेल्या लाखो रुपयांच्या अपहाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे. तरच असे प्रकार यापुढे होणार नाहीत.
-विलास जगताप, जिल्हा कार्याध्यक्ष, महासंघ