आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अर्भकांची अदलाबदल; नातेवाइकांनी केली डीएनए चाचणीची मागणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्रसूतीसाठी घाटीच्या वॉर्ड क्र. 27 मध्ये बुधवारी पहाटे आलेल्या महिलेच्या अपत्याची अदलाबदल झाल्याची घटना दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली. आधी डीएनए चाचणी करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर घाटी प्रशासनाने माघार घेतली. यामुळे रात्री 10 च्या सुमारास एकच गोंधळ उडाला.

सिल्लोड तालुक्यातील एक महिला सकाळी आठच्या सुमारास घाटीत प्रसूत झाली. तिला मुलगा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुपारी चारच्या सुमारास इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या मुलाची अदलाबदल करून तिला मुलगी, तर दुसर्‍या महिलेस तिचा मुलगा देण्यात आला. यामुळे त्या महिलेच्या नातेवाइकांनी डीएनए चाचणी करून अपत्य देण्यात यावे, अशी मागणी केली. घाटी प्रशासनाने प्रारंभी त्याला होकार दिला. मात्र, रात्री अचानक हा निर्णय बदलत तुम्हीच डीएनए चाचणी करून घ्या, असे त्यांना सांगितले. यामुळे एकच गोंधळ उडाला. याची माहिती मिळाल्यानंतर डॉ. कानन येळीकर यांच्यासह अन्य डॉक्टरांनी वॉर्डात धाव घेतली. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. महिलेच्या नातेवाइकांनी बेगमपुरा पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.