आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी रुग्णालयातील लिफ्टला आता "प्रत्यारोपणा'ची गरज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या५० वर्षांपासून रुग्णसेवेत असलेल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) विविध अत्याधुनिक यंत्रसामग्री आणली गेली. अनेक जोखमीच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मात्र, रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या येथील लिफ्ट जुनाट झाल्या असून या लिफ्टवर एकप्रकारे "प्रत्यारोपण शस्त्रक्रिया' करण्याची अर्थात जुनी काढून नवीन बसवण्याची गरज आहे.

१९६५ मध्ये तयार झालेल्या या इमारतीत अपंग तसेच रुग्णांच्या सोयीसाठी लिफ्ट लावण्यात आल्या. कुठल्याही लिफ्टचे आयुष्य साधारणत: २० वर्षे असते. पण घाटीतील लिफ्ट ५० वर्षे जुन्या असून त्या वारंवार बंद पडतात. परिणामी रुग्णांबरोबरच अपंगांना रुग्णालयाच्या पायऱ्या चढून त्रास सोसावा लागत आहे. विद्युत विभाग तसेच अधिष्ठाता कार्यालयाने याविषयी संचालनालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नाही. घाटी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ते दीड हजार रुग्ण उपचारांसाठी येत असतात. मंगळवारी अपंग प्रमाणपत्रासाठी जिल्हाभरातून किमान १५० ते २०० अपंग रुग्ण येतात. अशा वेळी लिफ्ट बंद असल्यास त्यांना अक्षरश: कसरत करावी लागते.
घाटीत १३ लिफ्ट
घाटीच्याविविध विभागांत १३ लिफ्ट आहेत. मेडिसिन इमारतीत ४, शस्त्रक्रिया विभाग ३, बाह्यरुग्ण विभाग १, महाविद्यालयात लिफ्ट आहेत. बाह्यरुग्ण तसेच शस्त्रक्रिया विभागातील जुन्या लिफ्ट बदलणे अत्यावश्यक आहे. मेडिसिन विभागाच्या लिफ्ट नव्या आहेत.

लिफ्टचा प्रस्ताव सादर
यालिफ्ट बदलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, त्यासाठी महिनाभर युद्धपातळीवर काम करावे लागणार आहे. २०१३ पासून विद्युत विभागाने सातत्याने लिफ्ट बदलण्याची मागणी संचालनालयाकडे केली आहे. २९ डिसेंबर २०१४ रोजी ३१ लाख ८० हजार रुपयांच्या नव्या लिफ्टचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

युरोज मेक कंपनीच्या या ५० वर्षे जुन्या लिफ्ट आयुष्य संपल्यामुळे वारंवार बंद पडत आहेत. शिवाय ही कंपनीही बंद पडल्याने लिफ्टमध्ये बिघाड झाल्यास त्याचे पार्ट्स मिळत नाहीत. अशा बनावटीची लिफ्ट सुरू करण्यासाठी आता तंत्रज्ञही उपलब्ध नाहीत. लिफ्ट बंद पडते तेव्हा मुंबईहून तंत्रज्ञ बोलवावे लागतात. त्यामुळे लिफ्ट सुरू होण्यास ते दिवस लागतात. यादरम्यान रुग्णांचे हाल होतात.

प्रस्ताव पाठवले
उपचारांसाठीच्यायंत्रसामग्रीला प्राधान्य दिले जाते. पण आगामी काळात आम्ही संचालनालयाकडे किमान बाह्यरुग्ण विभागाच्या लिफ्टसाठी पाठपुरावा करू. डॉ.कानन येळीकर, अधिष्ठाता

रुग्णसेवेसाठी युद्धपातळीवर काम करतो
Ãमहिनाभरातही लिफ्ट दुसऱ्यांदा बंद पडली होती. सोमवारी बंद पडलेली लिफ्ट शुक्रवारी सुरू झाली. औरंगाबादेत तंत्रज्ञ नसल्यामुळे मुंबईहून तंत्रज्ञ आल्याखेरीज काहीच करता येत नाही. लिफ्ट बदलणे हाच वारंवार होणाऱ्या अडचणीवरील पर्याय आहे. मी वारंवार प्रस्ताव दिले आहेत. लिफ्ट बंद असल्याचे अधीक्षकांनी बुधवारी २२ जुलैला पत्राद्वारे कळवले आहे. अजयकाळे, विद्युत विभाग अभियंता