आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghati Hospital Walky Talky Cctv Camera Technology Aurangabad

वॉकीटॉकी, डिस्प्लेने घाटीची संपर्क यंत्रणा बळकट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - घाटी प्रशासनाला नऊ वॉकीटॉकी, आठ डिस्प्ले बोर्ड, आठ नवे सीसीटीव्ही कॅमेरे बुधवारी (19 जून) प्राप्त झाले. त्यामुळे रुग्णालयातील एकूण कॅमेर्‍यांची संख्या सुमारे 60 झाली आहे. आता अपघात विभागालगतची संपूर्ण ‘सजिर्कल बिल्डिंग’ सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या टप्प्यात येणार आहे. या सुरक्षेच्या साहित्यामुळे रुग्णालयाची संपर्क यंत्रणा बळकट होणार असून वेगवेगळे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच सुरक्षेसाठी त्याचा मोठा उपयोग होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) नेहमीच वेगवेगळे पेचप्रसंग उभे राहतात. कधी रुग्णांच्या नातेवाइकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण होते, तर कधी शाब्दिक चकमकी घडतात. कधी डॉक्टर-तंत्रज्ञ-कर्मचार्‍यांकडून रुग्ण व नातेवाइकांना वाईट वागणूक मिळते. कधी रुग्णालयातून अर्भकांची अदलाबदल, अर्भकांच्या चोरीसारखे प्रकारही घडतात. काही वेळेला रुग्णांनी रुग्णालय व परिसरात आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश गैरप्रकार प्रकार हे सजिर्कल बिलिं्डगमध्येच घडले आहेत. त्यामुळेच उशिरा को होईना संपूर्ण ‘सजिर्कल बिलिं्डग’ कॅमेर्‍यात कैद होत असल्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. आता सुरक्षा रक्षकांकडे वॉकीटॉकी देण्यात येणार असल्याने संपर्क यंत्रणा बळकट होणार आहे. प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर वॉकीटॉकीसह सुरक्षा रक्षक असणार आहे.

गर्दीच्या ठिकाणी नवीन कॅमेरे
सजिर्कल बिल्डिंगमध्ये ज्या ज्या वॉर्डांसमोर, विभागासमोर नेहमीच गर्दी असते, अशा सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रसूती कक्षासमोर, रुग्णालयातून बाहेर पडणार्‍या सर्व मार्गांवर, लहान मुलांच्या वॉर्ड क्रमांक 24 व 25 परिसरात, ऑपरेशन थिएटर आदी ठिकाणी नवीन कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच डिस्प्ले बोर्ड हे अपघात विभागासह बाह्यरुग्ण विभागाच्या तळ मजल्यावर व पहिल्या मजल्यावर, ‘मेडिसिन बिलिं्डग’च्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर आणि ‘सजिर्कल बिल्डींगच्या’च्या तिन्ही मजल्यांवर बसवण्यात येणार आहेत. 48 इंची डिस्प्लेवर विविध स्वरूपातील माहिती व संदेश असतील. रुग्ण व नातेवाइकांना विविध वॉर्ड व विभागांची माहिती होण्याच्या दृष्टीने डिस्प्ले उपयुक्त ठरणार आहेत.