आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेसिडेंटना 60 तासांपर्यंत काम, ‘पीजी अँक्टिव्हिटी’वर गंभीर परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (एमडी-एमएस) घेण्यासाठी आलेल्या 217 निवासी डॉक्टरांना इर्मजन्सीच्या नावाखाली सलग 24 ते 60 तासांपर्यंत कराव्या लागणार्‍या कामामुळे नियमित ‘पीजी अँक्टिव्हिटी’ अर्थात पदव्युत्तर उपक्रमांना नियमित डच्चू मिळत आहे. दिवस-रात्र काम करावे लागत असेल तर त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ डॉक्टरांचा आराम आणि खासगी प्रॅक्टिस सुरू असते, तर दुसरीकडे रेसिडेंटना रुग्णसेवेचा नको तितका भार उचलावा लागतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने दररोज आठ तासांच्या, तर महिन्यातूून एकदा 12 तासांच्या इर्मजन्सी ड्यूटीचे निर्देश दिले आहेत, पण त्या निर्देशांची सर्रास पायमल्ली होत आहे.

रुग्णसेवा किंवा प्रशिक्षणाच्या नावाखाली कराव्या लागणार्‍या ‘मॅरेथॉन’ कामामुळे निवासी डॉक्टरांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर हे पूर्णवेळ कर्मचारी आहेत, तर निवासी डॉक्टर हे प्रशिक्षणार्थी आहेत, याचे भान वरिष्ठांनी सोडून दिले आहे. त्याचप्रमाणे गेल्या 35-40 वर्षांत निवासी डॉक्टरांच्या (2010 मध्ये) केवळ दहा जागा वाढल्या आहेत. रुग्णसंख्येचा दुप्पट-तिप्पट ताण आणि योग्य व्यवस्थापन नसल्याने निवासी डॉक्टरांवरील कामाचे ओझे वाढतच चालले आहे.

मॅरेथॉन इर्मजन्सी अशी : घाटीतील बहुतेक ‘क्लिनिकल’ विभागांमध्ये प्रत्येक निवासी डॉक्टरला आठवड्यातून किमान दोनदा 24 तासांची इर्मजन्सी ड्यूटी करावी लागते. सकाळी आठ ते दुसर्‍या दिवशी सकाळी आठपर्यंत सलग काम करावे लागते. त्यानंतरही रेसिडेंटला निघून जाता येत नाही. आठनंतर दाखल असलेल्या रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या, विविध सँपल प्रयोगशाळेत पाठवणे, राउंड घेणे, तातडीचे उपचार, नव्या रुग्णांना दाखल करून घेणे अशी सगळी कामे दिवसभर म्हणजेच 12 तास करावी लागतात. त्यामुळे आदल्या दिवशी सकाळी आठला सुरू झालेली ड्यूटी दुसर्‍या दिवशी रात्री आठनंतर म्हणजेच 36 तासांनी संपते. महिन्यातून एकदा, कधी दोनदा, तर कधी त्याहीपेक्षा जास्त वेळा एकानंतर दुसरी इर्मजन्सी सलग करावी लागते. दोन इर्मजन्सी सलग म्हणजेच 48 तासांची ड्यूटी केल्यानंतरही पुन्हा दिवसभराचे काम काही केल्या सुटत नाही. अशी तब्बल 60 तासांची ड्यूटी निदान ‘क्लिनिकल’ विभागांमध्ये प्रत्येकालाच महिन्यात कधी ना कधी करावी लागते. या काळात ना वेळेवर जेवण मिळते, ना झोप. अक्षरश: तास-दोन तास आराम करून रेसिडेंट पुन्हा रुग्णांच्या सेवेत उभाच असतो.

रेसिडेंटचे हाल; सरकारचे दुर्लक्ष
4 निवासी डॉक्टरला इर्मजन्सीनंतरही दिवसभर काम करावेच लागते. त्यामुळे अशी 36 तासांची इर्मजन्सी आठवड्यातून किमान दोनदा करावी लागते. महिन्यातून एकदा 60 तासांची डबल इर्मजन्सीही निवासी डॉक्टरांच्या वाट्याला येते. थिअरीचे वर्गही अनेक महाविद्यालयांत होत नाहीत. ही स्थिती औरंगाबादसह राज्यभरात सारखीच आहे. कामाचे तास कमी करण्याची मागणी ‘मार्ड’ने प्रत्येक वेळी केली आहे. दिल्ली व इतर राज्यांच्या तुलनेत विद्यावेतनही निम्मेच मिळते. मात्र, आमच्या मागण्यांकडे सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. डॉ. संतोष वाघचौरे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना

‘थिअरी’ वर्गांचा बळी
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा मोठा भर ‘प्रॅक्टिकल नॉलेज’वर असला तरी काही तास रोज ‘थिअरी’चे वर्ग होणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने घाटीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग फार कमी, किंबहुना होतच नाहीत, असे निवासी डॉक्टरांनी सांगितले. मुंबई-पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मात्र नियमित वर्ग होतात.