आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांग्लादेशींना घरे अन् आम्हाला प्रमाणपत्रे नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आपल्या देशात बांग्लादेशी नागरिकांना सर्रास घरे दिली जातात. परंतु भूमिपुत्र असणा-या आदिवासी समाजातील लोकांना साधी प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी अनंत अडथळे पार करावे लागतात. आजही अनेक आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही, अशी टीका आदिवासी कोळी समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड यांनी केली.

केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जुएल ओराम यांच्या उपस्थितीत सिडकोतील संत तुकाराम नाट्यमंदिरात मराठवाडा आदिवासी कोळी जमातीच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी घिसेवाड बोलत होते. आदिवासी असताना प्रमाणपत्रे मिळत नसल्याने त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. आदिम विकास परिषदेचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी केंद्रातून तीन वेळा शिफारशी आल्यानंतरदेखील महादेव कोळींना राज्य सरकारकडून त्रास दिला जातो. महसूल विभागाचे अधिकारी त्रास देतात, असे सांगितले. या वेळी माजी मंत्री दशरथ भांडे, साईनाथ अभंग, सिद्धेश्वर कोळी यांची भाषणे झाली. या मेळाव्याला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्षलवादी मानसिक विकृतीशी विकासाचा संबंध नाही : ओराम

नक्षलवाद ही मानसिक विकृती असून देशाची व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेले एक षड्यंत्र आहे. त्यामुळे त्याचा विकासाशी संबंध नसल्याचे मत केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी व्यक्त केले. ते रविवारी औरंगाबाद दौ-यावर आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर ‘दिव्य मराठी’शी त्यांनी संवाद साधला. आदिवासींचे मन जिंकणे हेच आपले लक्ष्य असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आदिवासींच्या विकासासाठी मंत्रालयाकडून मिळणा-या सुविधांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या समाजाला राजकीय, नोकरीत आणि बढतीमध्ये आरक्षणाची योग्य अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी मंत्रालयाकडून केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

विकासाशी नक्षलवादाचा संबंध नाही
देशात 150 पेक्षा आधिक जिल्ह्यांत नक्षलवाद आहे. विकास झाल्यावरही नक्षलवाद कमी होईल अशी शक्यता नाही. तो केवळ एक भ्रम आहे. नक्षलवाद वैचारिक लढाई नसून आंतरराष्ट्रीय पातळीवरून देशातल्या व्यवस्थेविरोधात केलेले षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.