आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ghrishneshwar Temple News In Marathi, Ellora, Aurangabad

घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी अर्धवस्त्राची परंपरा कायम ठेवा : बाबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी अर्धवस्त्राने दर्शन घेणे ही प्रथा नसून, अनादी काळापासूनची परंपरा आहे. त्यामुळे ती अबाधित राहावी, अशी भूमिका महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी शनिवारी मांडली.

दर्शनासाठी अर्धवस्त्राची अट असावी की नसावी, यावर मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या प्रतिक्रिया मागितल्या आहेत. शुक्रवारी शांतीगिरी महाराजांची भेट घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. बाबाजींनी या परंपरेला पाठिंबा दर्शवला. कपडे काढून दर्शन घेणे त्यागाचे प्रतीक मानले जाते. अर्धवस्त्राने वायुस्नान होऊन भक्त शुचिर्भूत होतात. त्यामुळे ही परंपरा बंद करू नये, असा आग्रह शांतीगिरी महाराज यांनी मांडला. ही दर्शन परंपरा कायम ठेवावी. वितुष्ट निर्माण करण्यासाठी हा गोंधळ सुरू आहे, असे आपेगावचे विष्णू महाराज आपेगावकर म्हणाले.