आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस गाइडशिप बहाल करणारे मोकळेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विद्यापीठात 26 बोगस पीएचडी मार्गदर्शक (गाइड) असल्याचे मान्य करीत प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले असले, तरी तो निव्वळ दिखाऊपणा आहे; कारण त्याच पत्रामध्ये कुलगुरूंनी स्वत:च्या हस्ताक्षराने ‘ज्यांनी अटी पूर्ण केल्या असतील, त्यांनी पुढील आरआरसीसमोर जाऊन गाइडशिप घ्यावी’ असे खुले निमंत्रण दिल्याचा आरोप होत आहे. त्याचवेळी ज्या अधिष्ठातांनी बोगस मार्गदर्शकांना गाइडशिप बहाल केली, त्यांच्यावर कुठेच कारवाई झालेली नाही. हे ‘डीन’ सर्वांत जास्त दोषी असल्याचा आरोप होत आहे.
व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी कुलगुरूंकडे बोगस मार्गदर्शकांविषयी तक्रार केल्यानंतर प्रशासनाने वर्ष-सव्वा वर्षानंतर बोगस पीएचडी मार्गदर्शक असल्याचे मान्य केले. संपूर्ण प्रकरणातील खर्‍या दोषींना म्हणजेच गाइडशिप बहाल करणार्‍यांवर कारवाई झालेली नाही, ती होणे आवश्यक वाटते असे मत अधिसभा सदस्य गजानन सानप यांनी व्यक्त केले. तर असे प्रकार या पुढे होऊ नयेत या साठी सर्वंकष समिती स्थापन करण्यात येईल. असे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी सांगितले.