आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्रक उत्पादकांना परराज्याचा आधार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - तालुक्यातील शेतक-यांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून अद्रकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. यावर्षी महाराष्ट्रात अद्रकाची जास्त लागवड झाली. प्रचंड प्रमाणात उत्पादित सर्व अद्रकाची खरेदी होईल एवढी मोठी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अद्रकाचे भाव गडगडले; परंतु परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतक-यांची होणारी हानी टळली. सध्या कन्नड तालुक्यातून सुरत, इंदूर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठांमध्ये अद्रक विक्रीसाठी जात आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कन्नड तालुक्यातील शेतकरी आद्रकाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. 2006 हे वर्ष सोडले तर इतर वर्षांमध्ये आद्रकला चांगली मागणी होती. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून तालुक्यात आद्रकाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले.
कन्नड तालुका आद्रक बेणे विक्रीचे माहेरघर बनले. गेल्या पाच वर्षांत येथून मोठ्या प्रमाणात बेणे विक्री झाले. जास्त उत्पादन घेण्यात कन्नड तालुक्याने आद्रकासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा व छत्तीसगडलाही मागे टाकले. यावर्षी राज्यात व राज्याबाहेरही आद्रकची जास्त लागवड झाली. 2008 ला आद्रकला प्रतिक्विंटल 4 हजार रुपये भाव होता, तर यावर्षी प्रतिक्विंटल 800 ते 1000 रुपये भाव मिळत आहे. प्रचंड उत्पादित सर्व आद्रकाची खरेदी होईल, अशी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही; परंतु आद्रकास परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान टळले. सध्या कन्नड तालुक्यातील आद्रक सूरत, इंदोर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठेत जात आहे. मजुरी, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या, ठिबक सिंचन आदी कारणांमुळे आद्रकचे उत्पादन घेण्यास शेतक-यांना जास्त खर्च लागला. त्यात आद्रकला येथे कमी भाव आहे; परंतु परराज्यातील बाजापेठांमुळे किमान खर्च भागून शेतक-यांच्या शिखात दोन पैसे येत असल्याने शेतकरी समाधानी आहे.