आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळाची स्थापना करून मुबलक औषधी उपलब्ध करून देऊ : महाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालय क्षमतांपेक्षा अधिक रुग्णांना सेवा देत आहे. रुग्णसंख्येबरोबरच औषधींच्या किमतीही आसमंताला भिडत आहेत. मात्र, औषधांसाठीचे बजेट जिथल्या तिथेच आहे. यासाठी सर्वप्रथम महामंडळाची स्थापना करून राज्यपातळीवर औषधी खरेदीची नवी पद्धती विकसित केली जाईल. यामुळे प्रत्येक शासकीय रुग्णालयात मुबलक औषधीसाठा उपलब्ध होईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी केली.
महाजन पुढे म्हणाले, रुग्णालयांत वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी नाहीत. सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारती, यंत्रसामग्री आहे, पण तज्ज्ञ डॉक्टरांअभावी ते बंद आहेत. या सर्व समस्या मला माहीत आहेत; पण येत्या तीन महिन्यांत मी आरोग्य समस्यांचा चेहराच बदलून टाकेन. शासकीय रुग्णालयाला बळकटी देण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.
तुम्हीदेवाचे दुसरे रूप : रुग्णांसाठीडॉक्टर हा देवाच्या स्थानी आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या बेसुमार लुटीमुळे त्यांची प्रतिमा डागाळत आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगली- वाईट माणसे आहेत. तेव्हा प्रतिमा टिकवून ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्यांची पुढच्या पिढीत पेरणी करणे ही शिक्षणासोबतच तुमची पहिली जबाबदारी आहे, असा सल्लाही महाजन यांनी डॉक्टरांना दिला.

मंचावर अभ्यागत समिती अध्यक्ष अतुल सावे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भागवत कराड, साधना सुरडकर, रेखा पाटील, प्रल्हाद पारटकर, किरण गणोरे आणि राम बुधवंत यांची उपस्थिती होती. डॉ. वर्षा देशमुख आणि डॉ. वैशाली उने यांनी सूत्रसंचालन केले.
नीटच्यामेरिटवरच अभिमतचे प्रवेश : राज्यभरातवैद्यकीय शिक्षणाच्या २५०० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहार वाढल्याने नवी पद्धती तयार करण्यात आली. अभिमत विद्यापीठांमध्येही नीटच्या गुणवत्ता यादीनुसारच ८५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. सुप्रीम कोर्टाने प्रवेशासाठीची अंतिम मुदत ३० सप्टेंबर दिली आहे. त्यामुळे निकाल लांबला, तर १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेशाला मुदतवाढ दिली जाईल, असे महाजन म्हणाले.
आम्हालातर वेगळेच काही सांगतात : पत्रकारपरिषदेत रेबीज लशीच्या तुटवड्याकडे पत्रकारांनी महाजन यांचे लक्ष वेधले असता अधिष्ठातांनी लस पुरेशी असल्याचे सांगितले. आठच दिवसांपूर्वी शहरात कुत्र्याने २२ जणांना चावा घेतला. त्यातील जणांना लस देता आली, हे लक्षात आणून देताच. महाजन म्हणाले, हे सगळे अालबेल असल्याचे सांगतात, प्रत्यक्ष स्थिती निराळीच आहे.

मालमत्तेचे ऑडिट लवकरच
आमखास मैदानावरील घाटीची जागा वक्फ बोर्डाने ताब्यात घेतली आहे. घाटीच्या नावे पीआर कार्ड असूनही असे झाले. यावर तुमची भूमिका काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, लवकरच आम्ही सर्व जागांचे ऑडिट करत आहोत. त्यातूनच प्रश्न सुटेल.
बातम्या आणखी आहेत...