आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी बहादूर मुलगी आहे, घाबरतच नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझ्यापप्पांचं ऑपरेशन होतं, म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी डिसेंबरला औरंगाबादला आले. पप्पांना भेटून पडेगावला आत्याकडे गेले. सकाळी वाजता मी खेळायला गच्चीवर गेले आणि उडी मारताना पडले. माझ्या पोटातून मोठी सळईच बाहेर आली होती. जोरात आवाज झाला, पण मी भ्यायले नाही. लगेच ताकद लावून सळई खेचून बाहेर केली, एकदम हीरोसारखी. मी बहाद्दूर मुलगी आहे, अशा शब्दांत वर्षांच्या साक्षी अवसरमल या मुलीने आपली शौर्यगाथा सांगितली. डॉ. संदीप हंबर्डे पाटील यांनी तास शस्त्रक्रिया करून साक्षीचे प्राण वाचवले.

फुलंब्री तालुक्यातील डोंगरगावच्या अवसरमल कुटुंबीयांवर हा प्रसंग गुदरला; पण साक्षीच्या हिमतीमुळे सगळेच या बाका प्रसंगाला तोंड देऊ शकले. शेतकरी कुटुंबातील रोशन अवसरमल यांची साक्षी ही धाकटी कन्या. वडिलांच्या ऑपरेशनसाठी ती आईसोबत शहरात आली. रुग्णालयात लहान मुलांना थांबवू नये म्हणून गावातच राहणाऱ्या आत्याकडे तिला पाठवले; पण चंचल स्वभावाची साक्षी गच्चीवर खेळायला गेली. तेथे बांधकाम चालू होते. त्यामुळे सळया मोकळ्याच होत्या. खेळता-खेळता साक्षी त्यावर जाऊन पडली.

मुलगी बहादूर असल्याने सगळे सहज झाले
^धिटुकल्या साक्षीने स्वत: सळई काढली. माझ्याकडे येईपर्यंत खूप रक्तस्राव झाला होता. तरीही तिने सगळा प्रकार सांगितला. जटिल शस्त्रक्रियेची कल्पना पालकांना दिली. तिच्या गुदद्वाराची जागा आता आम्ही पोटातून काढली आहे. दोन महिन्यांनी मूळ जागेवरील जखम बरी झाली की पुन्हा एक शस्त्रक्रिया केली जाईल. -डॉ. संदीप हंबर्डे पाटील

अशी घुसली सळई
गुदद्वारातून घुसलेली सळई थेट पोटातून बाहेर निघाली होती. साक्षीने ती काढली खरी; पण रक्तस्राव थांबत नव्हता. तिला पडेगावातील दोन दवाखान्यांत दाखवले, पण उपयोग झाला नाही. नातेवाइकांनी सिडकोतील डॉ. संदीप हंबर्डे यांच्याकडे नेले. सळई गुदद्वारातून घुसून मूत्राशय, गर्भपिशवीच्या मागील बाजूने पोटातून बाहेर निघाली होती. आतडे टाके देऊन जोडण्यात आले. रात्री १२ वाजेपर्यंत चाललेली ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती.
बातम्या आणखी आहेत...