आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींची संख्या मुलांपेक्षा कमीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहराची लोकसंख्या दरमहा साडेतीन ते चार हजारांनी वाढत असून जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत 32 हजार 214 बालके जन्माला आली. त्यातही मुलींची संख्या मुलांपेक्षा 1036 ने कमी आहे.

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात असून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे अद्याप समोर यायचे आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार मात्र या दरात फारसा फरक पडलेला नाही. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2013 या काळातील आकडेवारी शहराबाबत बोलकी माहिती देणारी आहे. आकडेवारीनुसार आठ महिन्यांत मुलांची संख्या 16 हजार 625 आहे, तर मुलींची संख्या 15 हजार 589 आहे. म्हणजे मुले आणि मुलांच्या संख्येत 1036 ची तफावत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहराची लोकसंख्या 11 लाख 71 हजार 330 असून त्यात मुलांची संख्या 6 लाख 10 हजार 377 आहे, तर मुलींचा आकडा 5 लाख 60 हजार 953 आहे. शहरात जन्माला येणार्‍या मुलींचे प्रमाण प्रत्येकी एक हजार मुलांमागे 859 एवढे आहे. औरंगाबादेत 0 ते 6 वयोगटातील मुलांची संख्या 1 लाख 51 हजार 827 आहे. त्यात 81 हजार 671 मुले असून मुलींची संख्या 70 हजार 156 आहे. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बालकांचे प्रमाण 12.96 टक्के आहे.