आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाने अभ्यास घेताना मुलीच्या तोंडात कांदा कोंबला, गुदमरून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह शेतात पुरला होता. - Divya Marathi
मुलीचा मृत्यू झाल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह शेतात पुरला होता.
औरंगाबाद - बीड बायपास रोडवरील बाळापूर गावातील स्मशानभूमीत मंगळवारी सकाळी सारे गाव उलटले होते. तीन ( शनिवारी ता. ९ ) दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह तेथे पुरण्यात आला होता. घशात कांदा अडकला म्हणून तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र तो कांदा जन्मदात्या बापाने कोंबला होता ही माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात बापावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुरलेला मृतदेह उकरण्यात आला. भारती राजू कुटे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास राजूने भारतीचा अभ्यास घेतला. सोबत मुलगा शिवाही होता. राजू पलंगावर बसून तिला समोर उभा करून उजळणी घेत होता. एक ते बारापर्यंतचा पाढा तिने न अडखळता म्हटला. तेरा उच्चारुन या निरागस मुलीने पुस्ताकातील १२ वर बोट ठेवले आणि हीच चूक तिच्या जीवावर बेतली. संतापलेल्या राजूने तिच्या कानशीलात लगावत, पलंगाखाली पडलेला कांदा तिच्या तोंडात कोंबला. पुढच्या खोलीत पत्नी अनुसया आणि राजूची आई सरसाबाई जेवण करत होती. त्यांनी भारतीच्या घशात अडकलेला कांदा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. भारती तडफडत होती. तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र तोपर्यंत काळाने डाव साधला होता. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. घाबरलेल्या राजूने बनाव रचला. तिच्या मृत्यूबद्दल गावकऱ्यांना खोटे कारण सांगितले. त्यानंतर गावातील लोकांसह तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र पितळ उघडे पडले. मुलीसोबत झालेल्या प्रकाराची वाच्यता कोणाजवळ करू नको, विसरून जा, असे पत्नी अनुसयाला राजूने धमकावले. त्यामुळे सुरुवातीला ती गप्प बसली.
शवविच्छेदनानंतर निघाला कांदा
स्मशानात पुरलेला मृतदेह तीन दिवसानंतर पोलिसांनी बाहेर काढला. शवविच्छेदनात घशात अडकलेला कांदा काढण्यात आला, अशी माहिती निरीक्षक काकडे यांनी दिली. राजूला छोट्या छोट्या गोष्टींचा नेहमी राग येत असे. तो नेहमी भांडण करत असे, असे गावकऱ्यांनी सांगितले. सात वर्षांपूर्वी त्याचा अनुसयासोबत विवाह झाला होता.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कसे उघडे पडले पितळ..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...