आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आवडत्या कॉलेजात प्रवेश घेण्यास भावाचा विरोध; बहिणीची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आवडत्या कॉलेजात प्रवेश घेण्यास भावाने विरोध केल्याने बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी मुकुंदवाडी भागातील जय मल्हारनगरात घडली. दीक्षा किसन साळवे (18) असे मृत युवतीचे नाव आहे.

दीक्षाने दोन दिवसांपूर्वीच एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तिचा भाऊ बाळू याला ते मान्य नव्हते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्याभरात दीक्षाने स्वत: ला काही वेळ घरात कोंडून घेत पंख्याला ओढणी बांधून आपली जीवनयात्रा संपवली. दीक्षा दरवाजा उघडत नसल्यामुळे बाळूला संशय आला आणि त्याने दरवाजा तोडला. तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त कळताच मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. प्राथमिक चौकशीत बहीण भावात भांडण झाल्याचे कारण समोर आले आहे असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पदमपुर्‍यातही एकाची आत्महत्या
पदमपुरा भागात एका 40 वर्षीय इसमाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजता घडली. तुळशीराम भिकाजी रमंडवाल असे मृताचे नाव आहे. तुळशीरामने स्वत:ला राहत्या घरात कोंडून घेतले. बराच वेळ त्याने दार उघडले नाही म्हणून लहान भाऊ महेंद्र रमंडवाल यांनी खिडकीतून आत डोकावले असता तुळशीराम फासावर लटकलेला त्यांना दिसून आला. क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.