आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी तरुणीने दिला औरंगाबाद पोलिसांना गुंगारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुणे येथील महिला सुधारगृहात दाखल करण्यासाठी घेऊन निघालेल्या दोन महिला शिपायांना गुंगारा देऊन आरोपी तरुणीने पलायन केले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार तरुणींना अटक केली होती. त्यापैकी दोन विवाहित महिलांची जामिनावर मुक्तता झाली तर अविवाहित तरुणींना सुधारगृहात दाखल केले होते. सोमवारी (11 फेब्रुवारी) न्यायालयाने एकीची रवानगी पुणे येथील महिला सुधारगृहात केली, तर दुसरीला औरंगाबादच्या सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस शिपाई अनिता भुसिंगे आणि कल्पना खंदारे त्या 22 वर्षीय तरुणीला पुण्याला घेऊन जात होत्या. त्यासाठी क्रांती चौकातील सुधारगृहातून तरुणीला घेऊन त्या चारच्या सुमारास ते मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचल्या.

बसस्थानकावर पुण्याच्या बसची वाट पाहत थांबल्या असता साडेचारच्या सुमारास ती तरुणी दोघींना गुंगारा देऊन पसार झाली. रेकॉर्डप्रमाणे ही तरुणी मुंबईची रहिवासी आहे. रात्री साडेआठपर्यंत तिचा शोध सुरू होता. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तरुणी कशी पळाली याची चौकशी करू. दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करू, असे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.