आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंत पडून बालिकेचा मृत्यू, भोकरदन येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- शहरातील आतार गल्लीमध्ये राहणारे शेख अमीन शेख चाँद यांच्या घराची भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून आठवर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. यात पाच जण जखमी झाले.

शेख अमीन शेख चाँद हे कुटुंबीयांसमवेत झोपलेले असताना पहाटे चारच्या सुमारास घराची भिंत कोसळली. यात ऐनाम मर्जिया (८) हिचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला, तर शेख अमीन, नइमुन्निसाबी शेख अमीन, जिकार शेख अमीन, कैफ शेख अमीन, अम्मारा शेख अमीन जखमी झाले.