आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळंद येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आळंद- घरातील दिवे लावण्यासाठी बटण दाबताना तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आळंद येथे मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
  
अर्चना रंगनाथ तायडे (१८, रा. आळंद) असे मृत तरुणीचे नाव अाहे. दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी आलेली अर्चना घरातील दिवे लावण्यासाठी बोर्डातील बटण (कळ) सुरू करण्यासाठी गेली असता तिला विजेचा जोराचा धक्का बसल्याने ती जागेवरच कोसळली. पुढील उपचारासाठी तिच्या नातेवाइकांनी त्वरित भारत विकास ग्रुपच्या रुग्णवाहिकेतून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी घाटीत उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दोन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वडोदबाजार ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
बातम्या आणखी आहेत...