आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तास लैंगिक शोषण करणा-या वासनांधापासून मुलीने स्वत:ची केली सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तीन तास लैंगिक शोषण करणार्‍या वासनांध तरुणापासून धाडसी मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली. बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला जमावाने चांगलेच चोपले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार 8 फेब्रुवारीला रात्री 7.30 ते 10.30 दरम्यान घडला.
सिडकोतील 14 वर्षीय मुलीवर कारमध्ये बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या सिद्धेश्वर काळदाते (32) या नराधमाला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. काळदाते हनुमाननगर (एन-4) येथे राहतो. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा, अपहरणाचा गुन्हा दाखल केला.सिल्लोड येथे आजी आजोबाकडे गेलेल्या या मुलीला करमत नसल्याने ती रात्री औरंगाबादला परतली. त्यानंतर गजानन महाराज मंदिरात दर्शन करून ती पायी हनुमाननगरकडे आली. त्या वेळी ही मुलगी रस्त्यावर उभी असताना या भामट्याने तिला कारमध्ये (एमएच 20 सीएस 4570) बळजबरीने बसवले. शनिवारी रात्री साडेसातनंतर तिला तीन तास कारमध्ये बसवून औरंगपुरा, गुलमंडी, हडको या भागात फिरवताना तो तिच्याशी लगट करीत होता. त्यानंतर त्याने कार हनुमाननगरातील गल्ली नंबर तीनमध्ये स्वत:च्या घराशेजारी आणून उभी केली. त्या वेळी पुन्हा मुलीला त्रास दिला. या वेळी मात्र मुलीने आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळावरील जमावाने तिला कारमधून बाहेर काढले. संतप्त जमावाने काळदातेला बेदम चोप दिला आणि त्याच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर मुलीने जवाहरनगर पोलिस ठाणे गाठून काळदाते या नराधमाच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण (363), प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड सेक्सुअल ऑफेन्स अँक्टचे कलम 8 नुसार गुन्हा दाखल झाला. काळदातेला अटक करून रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक माजिद शेख हे पुढील तपास करत आहेत.
धाडसी मुलीने केला चिवट प्रतिकार
2 हनुमाननगरातील गल्ली क्रमांक तीनमधील स्वत:च्या घरासमोर काळदातेने कार थांबवताच ती तिथून निसटली. एका घराच्या जिन्यावरून चढत ती स्लॅबवरील पाण्याच्या रिकाम्या टाकीत दडून बसली. याच वेळी तो तिचा शोध घेत तिथे आला आणि तिला पकडले. तिने ओरडू नये म्हणून त्याने तिचे तोंड दाबले. मात्र प्रचंड झटापट करीत तिने आरडाओरडा केला. त्या वेळी जमाव धावून आला.
1 वासनांध सिद्धेश्वर काळदातेने मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिला हेडगेवार रुग्णालयाशेजारच्या मैदानात नेताच कारमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने चिवट प्रतिकार केला.