आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: एकतर्फी प्रेमातून मुलींची छेड, एकाच दिवशी छेडछाडीच्या तीन घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एकतर्फी प्रेमातून मुलींची छेड काढल्याचे १६ फेब्रुवारी एकाच दिवशी तीन वेगवेगळे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबाजोगाई, उजनी तालुक्यातील अतुल राठोड (२८) हा एका तरुणीला फोनवर संपर्क साधून भेटण्यासाठी तगादा लावत होता. तिच्या घराचा पत्ता शोधून शुभेच्छांचे मेसेज पाठवायचा. २०१५ पासून हा प्रकार सुरू होता. तिला काॅलेजमध्ये जाऊन भेटण्याचाही प्रयत्न केला. १३ फेब्रुवारी राेजी त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी धैर्य दाखवत या तरुणीने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. 

दुसऱ्या एका घटनेत छावणी परिसरात २६ वर्षीय महिला जात असताना दुचाकीवरील तरुणाने त्यांना रस्त्यात अडवून बळजबरी दुचाकीवर बसण्याचा हट्ट धरून अश्लील चाळे केले. तू नंतर भेटली नाहीस तर जिवे मारण्याची धमकी देत तो निघून गेला. महिलेने रफिक ऊर्फ मुन्ना सय्यद हफीज (३०, रा. जयसिंगपुरा) याच्याविरुद्ध छावणी पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक गंगावणे तपास करत आहेत. 

तिसऱ्या घटनेत सोमीनाथ भालेकर (२२, रा. चितेगाव) याने १६ फेब्रुवारीला युवतीला घराच्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. ही घटना दुपारी ४.३० वाजता घडली. सोमीनाथ तिच्या घरात घुसला तेव्हा तरुणीची आजी मोठी बहीण घरात होती. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस नाईक मनगटे यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...