आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडणानंतर मैत्रीणीने घेतले पेटवून, वाचवण्यास गेलेल्या पती-पत्नीचाही मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मैत्रीण व पत्नीच्या भांडणानंतर रागाच्या भरात मैत्रिणीने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचाही जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२० ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास मुकुंदवाडीतील राजीव गांधीनगरात घडली. याच वेळी घराची भिंत कोसळल्याने शेजाऱ्यांना गॅसचा स्फोट झाला असावा असे वाटले.
 
मात्र पोलिस तपासात जाळून घेतल्याचे समोर आले आहे. यात शारदाबाई बहुले (४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सूर्यभान कचरू दहिहंडे (५५) आणि सुमन दहिहंडे (५०, दोघे रा. मोहटादेवी, बजाजनगर) यांचा शनिवारी उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. 
 
शुक्रवारी दुपारी सूर्यभान हे पत्नी सुमनसोबत मुकुंदवाडीतील शारदाबाईच्या घरी गेले तेव्हा दोघींमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. अचानक शारदाबाईने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. हे पाहून सूर्यभान आणि सुमन तिला वाचवण्यासाठी गेले असता त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला. यात दोघे गंभीर भाजले. याच वेळी अचानक घराची भिंत कोसळल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घराच्या दिशेने धाव घेतली. नागरिकांनी तिघांना उपचारासाठी घाटीत दाखल केले. तेथे डॉक्टरांनी शारदाबाईला मृत घोषित केले, तर सूर्यभान सुमन यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 
 
प्लॉटच्या वादाची चर्चा 
शारदाबाईचे ३० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र वर्षभरातच पतीला सोडून ती एकटी राहत होती. तिची ओळख सूर्यभानसोबत झाली. त्यांनी मुकुंदवाडी परिसरात एक प्लॉट खरेदी केला. हा प्लॉट विकून शारदाबाईकडून पैसे घ्यावेत, असे सुमन सूर्यभान यांना वाटत होते. यावरून त्यांचा वाद सुरू होता. 
 
बातम्या आणखी आहेत...