आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री सात मुलींना बसमधून उतरवले; अहमदनगरजवळ अडीच वाजता बॅगांसह मुली रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुण्याकडे जाणार्‍या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमध्ये बिघाड झाल्यामुळे ड्रायव्हर व क्लीनरने सात तरुणींसह यातील सुमारे ३५ ते ४० प्रवाशांना मध्यरात्री अडीच वाजता खाली उतरवले. ड्रायव्हर व क्लीनरने बेजबाबदारपणाचे वर्तन केले असतानाच अन्य प्रवासी आपल्या कुटुंबीयांसह मिळेल त्या वाहनाने निघून गेले. बसमधील मुलींची कोणी चौकशीही केली नाही. अखेरीस तब्बल दोन तासांनी मुलींनीच हिंमत दाखवून एक बस थांबवली व केिबनमध्ये बसून पुणे गाठले. ट्रॅव्हल्स कंपनीच्या मनमानीपणाविरुद्ध सोमवारी एका मुलीच्या आईने पोलसि ठाण्यात तक्रार दाखल केली.
रवविारी प्रसन्ना ट्रॅव्हल्सच्या कार्यालयातून सात मुलींनी पुण्यासाठी रात्री बाराच्या बसचे बुिकंग केले. मध्यरात्री अडीच वाजता बस अहमदनगरजवळ बस बंद पडली. तेव्हा ड्रायव्हर व क्लीनरने हात वर केले व ज्यांना जसे जमेल तसे निघून जा, आपले आपणच अॅडजस्ट करून घ्या, असा सल्ला देऊन दोघे बसमध्ये जाऊन झोपून गेले.

बेजबाबदारपणाचा कळस : यामुळे प्रवासी घाबरले. त्यांनी मिळेल तशी वाहने थांबवली व पुढील प्रवास सुरू केला. याच वेळी बसमध्ये सात मुली आपल्या सहप्रवासी आहेत याकडे कोणीच लक्षही नाही दिले. या तरुणींसाठी हा प्रकार नवीनच होता. पैकी चौघी बीई आर्किटेक्चर झालेल्या होत्या व नुकत्याच एका कंपनीत रुजू होण्यासाठी पुण्यात चाललेल्या होत्या. इतर तिघीही नोकरीनिमति्त पुण्याला निघाल्या होत्या. यामुळे त्यांच्याकडे मोठाल्या बॅग होत्या. दोन तास त्यांनी हात दाखवून ५ वाजता एक बस थांबवली. तिच्या केबनिमध्ये बसून त्यांनी ८ वाजता पुणे गाठले.

आईचा रुद्रावतार : यापैकी एका मुलीची आई ज्योती श्रीनाथ मचाले यांनी सोमवारी सकाळी प्रसन्नाचे कार्यालय गाठले. तेथे कर्मचार्‍यांनी चूक कबूल करण्यास टाळाटाळ केली. कंपनीच्या मालकाचा नंबर देणेही टाळले. यामुळे त्यांनी थेट सिडको पोलसि ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. जागृती मंचच्या अध्यक्षा प्रा. भारती भांडेकर यांनीही पोलसिांना कडक शब्दांत सुनावले. यानंतर पोलिसांनी प्रसन्नाच्या कार्यालयातून दोन कर्मचार्‍यांना ठाण्यात बोलावून चौकशी केली. तसेच कंपनीच्या औरंगाबाद कार्यालयाचे व्यवस्थापकही हजर झाले. त्यांनी ही बस श्रीरामपूरच्या बीएम ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. आपला संबंध केवळ बुकिंगपुरताच आहे. तरी आपण जबाबदारी झटकत नसल्याचे सांगतिले. तसेच उद्या ते स्वत: श्रीरामपूर येथे जाऊन कंपनीच्या मालकांना शहरात घेऊन येणार आहेत.
लायसन्स रद्द करा
अहमदनगरच्या रस्त्यावर दरोड्याच्या घटना घडत असतात. माझी मुलगी एका कठीण प्रसंगातून बचावली आहे. अशा अवस्थेत तिला पुण्यात जॉइनिंग करावी लागली. ट्रॅव्हल चालकासोबत सहप्रवाशांचे वर्तनही चुकीचे होते. अशा बेजबाबदार ट्रॅव्हल कंपनीचे लायसन्स रद्द करून कठोर दंड करायला हवा.

ज्योती मचाले, मुलीची आई प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर
देशभरात मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असताना मध्यरात्री या मुलींना एकटे सोडण्याचा प्रकार संतापजनक आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधति ट्रॅव्हल कंपनीला धडा शिकवला पाहिजे. प्रवाशांना सुरक्षा पुरवण्यासाठी महामार्गांवर पोलिसांनी कायम गस्त देणे गरजेचे आहे. प्रवाशांना वार्‍यावर सोडण्याची खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची परंपरा बंद होणे गरजेचे आहे.
प्रा. भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती मंच