आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड महिना खोलीत डांबून तरुणीवर बलात्कार, तिने दिला नराधमांना गुंगारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरुणीला दीड महिना खोलीत डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. जालना जिल्ह्यातील बदनापूरजवळील धोपटेश्वर भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरापर्यंत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चार दिवसांपूर्वी ही तरुणी नराधमांना गुंगारा देत बदनापूरहून औरंगाबादला पळून आल्यानंतर या गंभीर प्रकाराला वाचा फुटली. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
पीडित राधिका (बदललेले नाव) परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील अलनगरात आई आणि दोन भावंडांसोबत राहते. तिच्या पित्याने दुसरे लग्न केले असून तो अांध्र प्रदेशातील बासर येथे राहतो. दिवाळीसाठी राधिका बासरला गेली होती. ती तेथेच काही दिवस थांबली. त्या वेळी सावत्र आई आणि राधिकात वाद झाले. त्यामुळे आईने तिला पुन्हा पूर्णा येथे सोडण्यास सांगितले. दीड महिन्यापूर्वी राधिका वडिलांसोबत बासरहून पूर्णाकडे निघाली. राधिकाला झोप लागल्याने तिचे वडील रेल्वेतून उतरून पसार झाले. राधिकाला जाग आली तेव्हा वडिलांना पाहण्यासाठी ती रेल्वेच्या सिटवरून खाली वाकली असतानाच कोणी तरी तिच्या डोक्यावर प्रहार केल्याने ती बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी शुध्दीवर आली तेव्हा ती एका बंद खोलीत विवस्त्रावस्थेत होती. आरडाओरड करूनही मदतीला कोणीच आले नाही.
राधिकाच्या मते ही घटना जालन्यात घडली. तेथून तिला बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वरला नेले होते. दीड महिना तिला एका खोलीत डांबले होते. या घरात प्रल्हाद खाजेकर नावाचा माणूस दररोज दारू पिऊन तिला शिवीगाळ व मारहाण तसेच बळजबरी करत होता. ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मारून टाकतो. तुझ्या सावत्र आईनेच तुझ्याशी लग्न करण्यास मला सांगितले,’, असे म्हणत तो तिच्यावर अत्याचार करीत होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा...,
तिने कशी करून घेतली सुटका, दोन दिवस शहरात भटकंती..