आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानाच्या प्रगतीमुळे मुलींचा जन्मदर घटला- सहन्यायाधीश डोंगरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- विज्ञानाच्या प्रगतीबरोबर मानवाचे विचार अधोगतीकडे वळले. मातेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे लिंगनिदान करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाल्यापासून मुलींचा जन्मदर घटला आहे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायालयाचे सहन्यायाधीश डोंगरे यांनी केले. ते सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबिरात सोमवारी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे डॉ. डी. डी. शिंदे होते, तर मुख्य न्यायाधीश ए.एस. पंडागळे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. संजीवन मेने, उपाध्यक्ष अॅड. बी. डी. थोरात, अॅड. रवींद्र कुलकर्णी, मुख्याध्यापक अरविंद कांबळे उपस्थित होते. ते म्हणाले की, आजघडीला १००० मुलांमागे ९५० मुलींचा जन्म होतो. मात्र, प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद, सातारा, कोल्हापूर येथे १००० मुलांमागे केवळ ६०० ते ७०० मुलींचा जन्म होत आहे. त्यामुळे त्यांचे परिणाम समाजात दिसू लागले आहेत. नुकतेच गुजरातमध्ये भावांनी एका मुलीशी लग्न केल्याचे समोर आले आहे. मुली, महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:चा विकास साधल्यास भविष्यात त्यंाच्यावर गर्भलिंग निदान करण्याचा दबाव आणला जाणार नाही, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...