आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Sexual Harassment Issue At Aurangabad Two Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या दोघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- 14 वर्षीय मुलीचा सतत एक वर्ष पाठलाग करून लैंगिक छळ करणार्‍या भूपेश रगडे (19) आणि रजनीकांत आराक (20, रा. आंबेडकर) यांना अटक झाली. त्यांच्याविरुद्ध ‘लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण कायदा-2012’ नुसार कारवाई करण्यात आली आहे. कायदा अमलात आल्यानंतर आयुक्तालय हद्दीत दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा ठरला आहे.

छळ होत असल्याचे त्या मुलीने वडिलांना वर्षभरापूर्वीच सांगितले होते, परंतु भीतीपोटी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. कंटाळून आठवड्यापूर्वी मजुरी करणार्‍या त्या मुलीच्या वडिलांनी संजयकुमार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. छळ झालेल्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांनी दोन दिवस पाळत ठेवत रगडे आणि आराक यांना शनिवारी (23 मार्च) अटक केली. रगडे एका खासगी कंपनीत तर आराक मिस्त्रीकाम करतो.

असा आहे कायदा : लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण करणारा हा कायदा 22 मे 2012 रोजी अस्तित्वात आला. कायद्यातील नवीन तरतुदीनुसार गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींना कमीत कमी सात वष्रे कारावास आणि जास्तीत जास्त जन्मठेपही होऊ शकते, असे अँड. अशोक ठाकरे यांनी सांगितले.