आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी जाणा-या विद्यार्थिनीस पळशीत ट्रॅक्टरने चिरडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पळशी - शाळा सुटल्यानंतर घरी जाणा-या पळशी (ता. सिल्लोड) येथील बारावर्षीय विद्यार्थिनीस वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी पळशी शिवारात घडली. शुभांगी संजय महेर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
शुभांगी पळशी येथील जोगेश्वरी विद्यालयात सहावीमध्ये शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे दुपारी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर ती सायकलवरून घरी जात होती. त्याच दरम्यान उपळी शिवारातील अंजना नदी पात्रातून वाळू भरून पळशीकडे भरधाव ट्रॅक्टरने (एमएच 20 यू 7742) शुभांगीला हुलकावणी दिल्यामुळे व रस्ता अरुंद असल्याने तोल जाऊन ती खाली पडल्याने वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरखाली सापडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तिच्या घरापासून अवघ्या पाचशे फुटांच्या अंतरावर घडली.
घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण मुंढे, नायब तहसीलदार एन. सी. पवार, मंडळ अधिकारी शेखर शिंदे, तलाठी अभिलाषा म्हस्के आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.