आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मी सर्वांसाठी ‘Unlike’ म्हणत, तरुणीने घेतला टोकाचा ‘Decision’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवाजीनगर भागातील काबरानगर परिसरात राहणाऱ्या तरुणीने मी सर्वांसाठी ‘अनलाइक’ आहे. माझ्या डिसिजनमुळे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील, अशी सुसाइड नोट लिहून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सीमा प्रकाश अडकिणे (१९, रा. काबरानगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. सीमाने चिठ्ठीत आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरले नाही. 

सीमा ही देवगिरी महाविद्यालयात बीसीएस द्वितीय वर्षाला शिकत होती. पहिल्या वर्षाच्या दोन विषयांत तिला अपयश आले होते. मंगळवारी ती रात्री अकरा वाजेपर्यंत घरातील एका खोलीत अभ्यास करत होती. रात्री सगळ्यांसोबत तिने जेवणही केले. पहाटे अडीचच्या सुमारास घरातील सदस्य नळाला पाणी आले म्हणून उठले. मात्र, त्यांनी या खोलीकडे लक्ष दिले नाही. सीमा का उठली नाही म्हणून सकाळी साडेसहाच्या सुमारास तिला आवाज दिला. मात्र, काही प्रतिसाद मिळाल्याने भावाने रूमची खिडकी तोडली असता सीमाने लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती कळताच जवाहरनगर ठाण्याचे हवालदार यमाजी खटाणे घटनास्थळी पोहोचले. तिला तत्काळ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सीमाचे वडील रिक्षाचालक आहेत. सीमा नियमित अभ्यास करत असे. त्यांचे पत्र्याचे छोटे घर असूनही तिला एक खोली अभ्यासासाठी देण्यात आली होती. 
 
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी
मी सर्वांसाठी अनलकी आहे. माझ्या या डिसीजनमुळे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आता कधीच कोणाला माझ्यामुळे प्रॉब्लेम नाही होणार.. हा डिसीजन माझा आहे. मी गेल्यावर प्लीज कोणाला माझ्याबद्दल विचारू नका. बस, माझी कधीच आठवण काढू नका. असे समजा की मी जन्मत:च मेले होते. आणि बाबा सॉरी.. मी तुमची चांगली मुलगी नाही बनू शकले. मी गेल्यावर स्वत:ला सांभाळा, काळजी घ्या मला माफ करा, असे या चिठ्ठीत लिहिले होते. 
 
मुलांनो टेन्शन आले, तर आम्हाला फोन करा 
छोट्यासमस्यांना कंटाळून मुले आत्महत्या करीत आहेत. पालकांसह विद्यार्थ्यांना कोणतेही टेन्शन असेल तर मन शांत ठेवा. एकदा आम्हाला फोन करा. आपण नापास झालो म्हणजे सर्व संपले असे नाही, तर अपयश आपल्याला बरेच काही शिकवून जाते हा विचार करायला हवा, असे आवाहन मानसोपचार तज्ञांनी केले आहे. 
संपर्क : डॉ संदीप शिसोदे -८८८८१७११२२,
प्रा.दिलीप गौर - ९८२२२२०७७१. 
 
पुढीलस्लाइडवर पाहा सीमा अडकिणे हिने लिहिलेली सुसाइड नोट...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...