आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वी परीक्षेत नापास झाल्यामुळे औरंगाबाद, यवतमाळमध्ये 2 मुलींची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 12वीच्‍या परीक्षेत नापास झाल्‍यामुळे औरंगाबादेत एका तरुणीने रेल्वेसमोर उडी मारुन आत्‍महत्‍या केली आहे. मनीषा भाऊसाहेब गायकवाड असे तरुणीचे नाव आहे. मनीषाला केवळ 4 मार्क कमी मिळाले होते. दुसरीकडे यवतमाळमध्येही 2 विषयात नापास झाल्‍याने एका विद्यार्थीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली आहे.   
 
चार गुण कमी मिळाल्याने तिने कवटाळले मृत्यूला
12वीच्‍या परीक्षेत केवळ चार गुण कमी मिळाल्यामुळे नापास झालेल्‍या एका तरुणीने रेल्वेसमोर उडी मारुन आपले जीवन संपवले. ही घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रकाशनगर येथे घडली. मनीषा भाऊसाहेब गायकवाड (रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे मृत तरुणीचे नाव असून ती मनमाड येथील महाविद्यालयात शिकत होती.
 
दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर झाला. निकाल पाहिल्‍यानंतर मनिषा खूप निरश झाली होती. दुपारी मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्‍या मनिषाने घरापासून 100 मीटर दुर असलेल्या रेल्वे पटरीवर जाऊन हैदराबाद पॅसेंजर समोर येत आत्महत्या केली. हा प्रकार रेल्वे पटरीवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास आला. त्‍यानंतर त्या व्यक्तीने या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहास शवविच्छदानासाठी घाटी रुग्णालयात आणले व  घटनेची नोंद केली.
 
यवतमाळमध्‍ये विधार्थिनीची आत्महत्या
12वीच्‍या परीक्षेत दोन विषयात नापास झाल्यामुळे विधार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी 4 वाजता सेवानगर भागात घडली. कोमल विठ्ठल चचाणे असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. ती येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात 12 वीचे शिक्षण घेत होती. दुपारी ऑनलाईन निकाल बघितल्यानंतर इंग्रजी व अर्थशास्त्र विषयात नापास झाल्यामुळे नैराश्यातून कोमलने हे आत्मघाती पाउल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
 
घटनेच्यावेळी कोमलची आई बाहेरगावी तर वडील ऑटो घेऊन बाहेर गेले होते. परीक्षेत नापास होण्याची भीती व नापास झाल्यामुळे विधार्थिनीने आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना असून काही महिन्यापूर्वीच रागिनी गोडे नावाच्‍या मुलीने आत्महत्या केली होती. शिक्षण आणि पुढील करीअरच्‍या वाढत्या दबावामुळे विद्यार्थ्यांकडून आत्महत्या सारखे पर्याय निवडणे पालकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...