आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद- वाळूज येथील आयसीईईएममध्ये दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या ऐश्वर्या बालाजी मुंडकर (२०, रा. सेलू) हिने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बन्सीलालनगरातील एका वसतिगृहात गळफास घेतला. मित्रासोबत झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. एेश्वर्यासोबत वसतिगृहात राहणारी तिची मैत्रीण महाविद्यालयात गेली होती. तेव्हा तिने गळफास घेतला. सायंकाळी मैत्रीण परतल्यावर ऐश्वर्या दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे मुलींनी खिडकीतून डोकावून पाहिले असता गळफास घेतल्याचे दिसले. वसतिगृहाच्या वाॅर्डनने ही माहिती वेदांतनगर पोलिसांना दिली. पोलिसांना एका रजिस्टरमध्ये मजकूर लिहिलेला आढळला. परंतु तो नेमका कशा संदर्भात आहे, हे तपासाअंती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...