आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने रोडरोमिअोची ठाण्यात उतरवली नशा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘सैराट’सिनेमाची नशा चढलेल्या एका मुलाने अल्पवयीन मुलीची छेड काढली, पण मुलीने त्याची प्रेमाची नशा उतरवण्यासाठी आई-वडिलांच्या सहकार्याने पोलिस ठाणे गाठले.
ही घटना बुधवारी सकाळी घडली. आठवीत शिकणाऱ्या मुलीला सोळा वर्षांचा मुलगा छेड काढून तिला रोज त्रास देत होता.
शेवटी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी मुलाला पकडले आणि मुलीसह पालकांना ठाण्यात बोलावले. त्यांनी मुलाला भेदरलेल्या मुलीसमोर उभे केले आणि त्याला चोप देण्याचे सांगितले. मुलीला प्रथम वाईट वाटले; पण आई, वडील आणि पोलिस मदतीला असल्यामुळे तिने त्याला चोप दिला. मुलगा मोठमोठ्याने रडू लगला. तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनाही दया आली आणि त्यांनी मुलीच्या आई, वडिलांना तक्रारीबाबत विचारणा केली. त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला आणि प्रकरणावर पडदा पडला.
बातम्या आणखी आहेत...