आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त डॉक्टरांनाच नव्हे, गर्भपात करणा-या आई-वडिलांनाही शिक्षा करा : राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्त्री भ्रूणहत्येचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. केवळ सोनोग्राफी सेंटर व डॉक्टरांवर कारवाई करून ही समस्या सुटणार नाही. अशा प्रकारचे कृत्य करणा-या आई-वडिलांनाही शिक्षा व्हायला हवी, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले. हा मुद्दा जनजागृतीचा असून, आंदोलनाचा नाही, असेही ते म्हणाले.
माजलगाव, अंबाजोगाई येथील खटल्यांच्या तारखेसाठी राज सोमवारी औरंगाबादेत होते. टोलनाका आंदोलनावरील आरोपांवर ‘आपण काही करायचे नाही आणि दुसरा चांगले काम करीत असेल तर त्यालाही ते करू द्यायचे नाही,’ असा टोला त्यांनी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. टोलनाक्यांवर होणारी लूट शांतपणे पाहत बसणे आम्हाला शक्य नाही. वाहन मोजणी अभियानाच्या अहवालाचा अभ्यास करून आठ दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवू. अधिवेशनात हा मुद्दा लावून धरू. तसेच राज्यातील इतर सर्व प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.
माजलगावात जामीन मंजूर
माजलगाव - मनसेच्या 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन खटल्याप्रकरणी राज सोमवारी माजलगाव न्यायालयात हजर झाले. साडेसात हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने राज यांना जामीन दिला.
बेळगावप्रकरणी महाराष्‍ट्रातील भाजप नेत्‍यांचे मौन का? राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरेंवर अजामिनपात्र वॉरंट
मनसेचे टोलनाका आंदोलन हफ्तावसुलीसाठीच- उद्धव ठाकरे