आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडेगावात आणखी एका मुलीचे केस कापले, आठवडाभरातील चौथी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोमलनगर(पडेगाव) भागातही रविवारी (३ सप्टेंबर) रात्री आठवीत शिकणाऱ्या एका मुलीची वेणी कापण्यात आली. छावणी पोलिस ठाण्यात या घटनेची फक्त नोंद करण्यात आली. गेल्या आठवडाभरातील ही चौथी घटना आहे. 
 
कोमलनगर येथील एका व्यावसायिकाच्या घरी हा प्रकार घडला. बहीण आणि भाऊ त्यांच्या तर आई- वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास ज्या वेळी कुटुंबीयांना जाग आली तेव्हा मुलीचे केस कापल्याची घटना समोर आली. विशेष म्हणजे या घटनेतही घराचा दरवाजा बंद असल्याची माहिती पालकांनी दिली. 
 
तक्रार नोंद नाही 
पोलिसांनीघटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तक्रार नोंदवण्यासाठी मुलीसह कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात यावे, असे मुलीच्या वडिलांना सांगितले. अगोदरच भेदरलेली मुलगी अजून घाबरू नये म्हणून कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात जाणे टाळले. 
बातम्या आणखी आहेत...