आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वाळूज एमआयडीसी ठाण्यात एकावर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- बाथरूमला जाणाऱ्या एका तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना वडगाव कोल्हाटी येथे शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

पीडित मुलीसह तिच्या बहिणी अशा तिघी जणी आपल्या घराच्या ओट्यावर गप्पा करत बसल्या होत्या. तेव्हा पीडित मुलीच्या काकाच्या मुलीला भेटण्यासाठी बाळू राजपूत हा तरुण तिथे आला. त्यानंतर तो बाथरूमला जायचे बोलल्याने त्याला आजीने बाथरूम पाठीमागे असल्याचे सांगितले. तेव्हा बाळू तिथे जाऊन परत माघारी आला. बाथरूम सापडत नसल्याचे त्याने सांगितल्याने आजीने पीडित अल्पवयीन मुलीला बाथरूम दाखविण्यासाठी त्याच्यासोबत पाठविले. तेव्हा त्याने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक ताहेर पटेल तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...