आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलींचे अपहरण, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलींसह आरोपी ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- चित्रपटासाठी हिरोईन करतो म्हणून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून मुलींना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राहुल चंद्रकांत खडके आणि विजय चंद्रकांत खडके (रा. माहेगाव तळणी, ता. रेणापूर) अशी आरोपींची नावे आहेत.  आरोपी सख्खे भाऊ असून ते गेल्या सहा महिन्यांपासून लातुरातील रेणुकानगरात एका घरामध्ये भाड्याने राहत होते.  त्यांनी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असल्याचे सांगून काही ठिकाणी शूटिंगही केली होती. तसेच  ‘कॉलेज लाइफ’ हा चित्रपट काढत असल्याची बतावणी करून अनेक तरुण व तरुणींचे अॉडिशन घेतले होते. शिवाय परळी परिसरात या चित्रपटाची शूटिंग करून तो लवकरच रिलीज करण्यात येणार असल्याचे भासवण्यात आले होते. त्यामुळे अपहरण झालेल्या दोन्ही मुली त्यांच्या सापळ्यात अडकल्या होत्या.
 
अपहरण झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुली रेणुकानगरातीलच असून दोघीही १६ वर्षांच्या आहेत. दोन्ही मुलींसोबत आरोपींनी शूटिंगही केली होती. दोन दिवसांपूर्वी आरोपीने दोन्ही मुलींना फोन करून घराबाहेर बोलावले. त्यानंतर त्यांना घेऊन आरोपींनी पलायन केले.  घटनेच्या दिवशी दिवसभर मुली घरी न परतल्याने एका मुलीच्या आईने रविवारी पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी सगळा घटनाक्रम ऐकून आरोपींचा माग काढला. त्यानंतर सोमवारी पहाटे गुन्हा दाखल करून सकाळी आरोपींना लातुरातूनच अटक केली.  

अनेकांची फसगत?
आरोपींनी चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून अनेक तरुण-तरुणींची फसवणूक केल्याची चर्चा आहे. त्यानुसार पोलिस तपास करत आहेत.  नेमकी िकती जणांची फसवणूक झाली, िकती तरुणींची लुबाडणूक झाली याचा तपास पोलिस करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...