आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुली म्हणाल्या, क्षणोक्षणी आमची असह्य घुसमट ! छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : येताना-जाताना छेडछाड होते. शाळेत बोलल्यास चर्चा होते आणि घरी सांगितले तर आईवडील शाळेत पाठवत नाहीत. अशा परिस्थितीत करायचे तरी काय? बोललो तर मुलींचाच दोष म्हणून हिणवले जाते. सततची होणारी ही घुसमट सोसवत नाही
 
. पण सुरक्षेसाठी एकदा शाळेत आलो की शाळा सुटेपर्यंत आम्ही बाहेरच जात नाही, अशा भावना शहरातील काही विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे काही टारगट मुले मुलींच्या स्वच्छतागृहातही डोकावतात, अशी खळबळजनक माहितीही एका विद्यार्थिनीने दिली. 
 
छेडछाडीमुळे कंटाळून समर्थनगर परिसरातील शाळेत शिकणाऱ्या एका नववीच्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याच शाळेतील एका विद्यार्थिनीने सांगितले की, शाळा परिसरात काही टारगट मुले उभी राहून टवाळी करतात.
 
मुली, विद्यार्थिनींना अश्लील बोलतात. तेव्हा घरी सांगावे की पोलिसांना, हा प्रश्न पडतो. किमान त्यांच्या गाडीचे नंबर तरी पोलिसांना कळवावेत, असे बऱ्याच वेळा मनात येते. मात्र, ही मुले नेहमीच टोळक्याने येतात. सारख्या गाड्या बदलतात. पाठलागही करतात. शाळेची स्थितीही चांगली नाही. मजबूत दारे- खिडक्या नाहीत. ही मुले शाळेत कशी घुसतात, हेच कळत नाही. 
 
पोलिस योग्य कारवाई करत नाहीत : एकाविद्यार्थिनी म्हणाली, एकट्याने शाळेत जावे लागते. त्यामुळे भीतीदेखील वाटते. त्यामुळे एकदा शाळेत आले की शाळा सुटेपर्यंत आम्ही बाहेर पडत नाही. छेडछाडीचे प्रकार नेहमीच होतात. त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
 
पोलिस योग्य कारवाई करत नाहीत. प्रत्येक वेळा ते तक्रारींची वाट पाहत राहिले तर आम्ही सांगू शकणारा त्रास दूर होईल कसा? बऱ्याचदा आपली शाळाच बंद होईल म्हणून मुली बोलत नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...