आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहाे मास्तर, तुम्हीसुद्धा? गणिताचा शिक्षक पेशाशीच गद्दार; पालकांमुळे गुन्हा, शाळेतून बडतर्फ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींना क्रमिक पुस्तकातील गणिताचे धडे शिकवण्यापेक्षा तीन वर्षांपासून लंपटपणाची गणिते मांडणाऱ्या शिक्षकाविरुद्ध पालकांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणित विषय शिकवणारा विलास काकडे हा शिक्षक विद्यार्थिनींशी लगट करून विकृत चाळे करत होता. घरी न सांगण्यासाठी विद्यार्थिनींवर दबाव आणत होता. विद्यार्थिनींनी चार वेळा तक्रार करूनही शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर तीन वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार एका विद्यार्थिनीने पालकांना सांगितला आणि या प्रकाराला वाचा फुटली. हे कळताच पालक शाळेत जमा झाले. त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला कारवाईची मागणी केली. मात्र, शाळेचे प्रशासन पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पालकांवर दबाव आणत होते. तो झुगारून पालकांनी जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. गुन्हा दाखल होताच शाळेने पेशाशी गद्दार या शिक्षकाला काढून टाकले आहे. 
पालकांच्या दबावानंतर शिक्षक विलास काकडेविरोधात एका मुलीच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि मग शाळेने त्याला काढून टाकले. 
 
लंपट शिक्षक नववीच्या विद्यार्थिनींना म्हणायचा : ट्यूशन बंक करतेस का? आपण सोबत 
जाऊ, तू माझ्यासाठी खूप काही करू शकतेस, तुझ्या आईचा मोबाइल नंबर दे..... 
मुली स्वच्छतागृहात गेल्या की काकडे स्वच्छतागृहाबाहेरच उभे राहत असे. तुम्ही काय करताय ते मला माहिती आहे, असे म्हणत असे. तू कुठे ट्यूशनला जाते? तुला कोण सोडवायला येतो? घ्यायला कोण येतो? तू एकटीच जात- येत असशील तर मला सांग, मी घ्यायला येतो. तुम्हाला ट्यूशन बुडवायला आवडेल का? मग आपण सोबत जाऊ. कमी मार्क्स मिळाले तर मी विषयाची तयारी करून घेतो. पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? तुझे वडील काय करतात? घरी कोण-कोण असते? तुझ्या आईचा मोबाइल नंबर दे. तुला किती प्रॉपर्टी आहे? असे प्रश्न काकडे नेहमी विचारायचा. वर्गात शिकवताना मुद्दामहून मुलींच्या पायाला पाय मारून जायचा. तू माझ्यासाठी खूप काही करू शकते, असे बोलून विद्यार्थिनींना जवळ उभे राहायला सांगायचा. याबाबत आम्ही सत्तर ते ऐंशी मुलींनी शाळा प्रशासनाला वारंवार सांगितले होते. पण आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे या उच्चभ्रू शाळेतील विलास काकडे या गणिताच्या शिक्षकाच्या छळाला बळी पडलेल्या विद्यार्थिनींनी सांगितले. 
 
दहावीत गेलेल्या मुलींनी सांगितले होते, ‘काकडे सर से बचके रहना...’ 
‘अरे वो काकडे सर से बचके रहना...’ असे सांगत नववीतून दहावीत गेलेल्या मैत्रिणींनी या विद्यार्थिनींना आधीच सजग करून धोक्याचा इशाराही दिला होता. 
 
मुलींसाठी सुरक्षा समितीचा फक्त दिखावाच, कारवाई मात्र शून्य 
तुमच्या शाळेत महिला तक्रार निवारण समिती आहे का, असे विचारले असता आमच्या शाळेत मुलींसाठी सुरक्षा समिती आहे, असे प्राचार्य म्हणाले. मग इतक्या वेळा विद्यार्थिनींनी तक्रार करूनही काहीच कारवाई का नाही केली? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. काकडेबद्दल तक्रारी होत्या, पण अशा स्वरुपाच्या नव्हत्या, असे ते म्हणाले. 
 
वर्गमित्रांनी धीर दिला म्हणून विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले : 
वर्गात काकडेकडून होणारेवर्तन वर्गातील इतर मुले पाहत होते. आम्हा मुलींना ते सपोर्ट करायला लागले की काकडे त्यांना नापास करण्याची धमकी द्यायचा. तेव्हा तुम्ही पालकांना सांगा, असे वर्गातील मित्रांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थिनींना धीर आला. त्यांनी पालकांना सांगितल्यावर बुधवारी काही पालकांनी येऊन काकडेला चोपही दिला. 
 
पुढील स्लाइडवर, पालक म्हणाले : आमच्या मुलींच्या सुरक्षेचे काय? आम्ही विश्वास तरी कुणावर ठेवायचा? आणि पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...