आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - तुमच्याकडे कोणी वाईट नजरेने बघत असेल तर त्याला तेथेच झापड मारा, असा स्पष्ट सल्ला पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणींना दिला. झापड मारल्यानंतरच्या सर्व बाबी आम्ही बघून घेऊ, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय वाहतूक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी जाहीरपणे त्यांनी हे वक्तव्य केले.
आयुक्त म्हणाले, इकडे येताना मी सरस्वती भुवन कॉलेजच्या बसस्टॉपजवळून आलो. रिक्षा उभी करून एक जण मुलींकडे बघत होता. मी चालकाला सांगितले आणि पोलिसांना बोलावून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. अशी छेडछाड कोणी करत असेल तर मुलींनी न घाबरता झापड मारायला हवी. वाईट नजर ठेवणारा तुम्हाला दोन मारील.
त्याची तयारी ठेवा. पण त्यानंतर आम्हाला भेटा. पुढचे आम्ही बघून घेऊ. आम्ही कारवाई करू. नंतर मुलींकडे बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
या वेळी आमदार प्रदीप जैस्वाल, शहराचे तीन पोलिस उपायुक्त, सहा सहायक आयुक्त, दै. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक धनंजय लांबे, ज्येष्ठ पत्रकार गणेश तुळशी, वाहतूक पंधरवडा घेण्यासाठी पोलिसांना मदत करणारे लायन्स क्लब ऑफ सेंट्रल तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी सांगितला स.भु. स्टॉपवरील प्रसंग
मुलींसाठी सुविधा
मुलींसाठी स्वतंत्र वेबसाइट आहे. संपर्कासाठी मोबाइल क्रमांक दिले आहेत. त्याचा नक्कीच फायदा होईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कमतरतेची कबुली
मनुष्यबळ कमी असल्याने आम्ही सर्वत्र पोहोचू शकत नसलो तरी कायदेशीर कारवाई करू शकतो.
टाळ्यांचा कडकडाट
टवाळखोरांना झोडपा, या आयुक्त संजयकुमारांच्या सूचनेचे तरुणींनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.