आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत वकिलाच्या वारसाला ६७ लाखांची भरपाई द्या - मोटार अपघात न्यायाधिकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - दुचाकीवरून हायकोर्टात जाणाऱ्या वकिलाला जालना रोडवर धडक देणाऱ्या आणि वकिलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरचालक, मालक तसेच विमा कंपनीने मृताच्या वारसांना ६७ लाख ८० हजार ७२ रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे न्यायाधीश एस. जी. शेटे यांनी दिले.

२३ मार्च २०११ रोजी सकाळी अॅड. नितीन चितलांगे दुचाकीवरून हायकोर्टात जात होते. दरम्यान ट्रॅक्टरने (एएक्सव्ही-५५२७) त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात अॅड. चितलांगे हे गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान १२ जुलै २०११ रोजी मृत्यू झाला. त्यांची पत्नी स्वरूपा इतर वारसांनी अॅड. नितीन साळुंके यांच्यामार्फत दावा दाखल केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर नुकसान भरपाईचे आदेश दिले.

सहा टक्के व्याजाने भरपाई
मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या आदेशा नुसार ट्रॅक्टर चालक, मालक विमा कंपनीला नुकसान भरपाईच्या रकमेवर सहा टक्के प्रति वर्षाप्रमाणे २०११ पासून व्याजही द्यावे लागेल.