आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश दिला एमपीएससीला, बसवले बँकिंगच्या वर्गाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना औरंगपुऱ्यातील ‘नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम’ (एनएसजीई) या संस्थेने झटका दिला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मुलांनी येथे प्रवेश घेतला; पण शिकवण्याऐवजी सहा महिने रोज नवीन ट्रेनर आणून त्यांचीच चाचणी घेण्यात आली. मात्र, पुरेशी विद्यार्थी संख्या झाल्यामुळे संचालकांनी त्यांना चक्क बँकेच्या परीक्षा वर्गांना बसण्याचा सल्ला दिला आहे. सहा महिने तर वाया गेले आता निदान आमचे पैसे तरी परत करा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत, तर आरोप करणाऱ्या दोन विद्यार्थिनी धादांत खोटे बोलत असून पैसे परत हवे म्हणून त्या असे बोलत असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारी वर्गाच्या नावाखाली शहरात अनेक संस्थांचे पेव फुटले आहे. औरंगपुऱ्यातील नॅशनल स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एक्झाम त्यापैकीच एक. संस्थेचे मुख्यालय पुण्यात आहे. एनएसजीईने १५ हजार रुपये फीस भरून परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत क्लास करण्याची सुविधा दिली आहे. असे असले तरी या क्लासवर विद्यार्थ्यांची कृपादृष्टी पडलेली नाही.
वर्गात फक्त चारच प्रवेश : दुपारीते या बॅचसाठी ऑगस्ट २०१५ मध्ये दोन मुले आणि दोन मुली अशा चौघांनी येथे प्रवेश घेतला. पैकी एक मुलगा नियमित येत नव्हता. वर्गात केवळ तिघेच उरले. मुले कमी असली तरी येथे नियमित वर्ग होणे अपेक्षित होते; पण सहा महिन्यांत राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे लेक्चर वगळता दुसरे लेक्चर झाले नाही, असा दोन विद्यार्थिनींचा आरोप आहे. दरवेळी डेमो लेक्चरसाठी नवनवीन फॅकल्टी यायचे. मुलांना अभिप्राय विचारून त्यांचा निकाल लावला जायचा. या डेमो लेक्चरमध्येही तोच तो विषय शिकवला गेला. अशा पद्धतीने तीन महिने संपले. विद्यार्थी अस्वस्थ झाले. त्यांनी ऑक्टोबरमध्येच क्लास सोडण्याची मागणी केली; पण दिवाळीनंतर व्यवस्थित वर्ग चालतील, असे संचालक म्हणाले; पण नंतरही परिस्थिती बदलली नाही. जानेवारी अर्धा उलटला तरी हेच हाल आहेत.
आताम्हणे बँकेला बसा
वर्गहोत नसल्याने त्रस्त विद्यार्थ्यांनी संचालकांकडे तक्रार केली. भरलेली अर्धी फी परत करण्याची मागणी करू लागले. यावर संस्थेने त्यांना आता बँकेच्या वर्गात बसा, असा अजब सल्ला दिला. यामुळे विद्यार्थ्यांनी डीबी स्टारकडे तक्रार केली. येथे वर्गांचे वेळापत्रक नाही. नोट्स देण्यात आलेल्या नाहीत. अभ्यासिका, वॉशरूम नाही. मागणी करूनही फी भरल्याची पावती देण्यात आलेली नाही. सहा महिने तर वाया गेले निदान आता आमची फी तरी परत करा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत; परंतु संस्थेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मला तर धक्काच बसला
मी लग्न होऊन नाशिकहून शहरात आले आहे. दररोज कांचनवाडीहून वर्गासाठी यायचे, पण वर्ग होत नव्हते. अनेकदा तक्रार केली. ते तात्पुरता दिलासा द्यायचे. आता ते आमच्यावरच खोटे बोलण्याचा आरोप करताहेत हे ऐकून धक्का बसला. या क्लासमुळे आमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले. संस्थेने पैसे परत करावेत. अंजली भवार, त्रस्त विद्यार्थिनी
फक्त त्रासच झाला
मी बुलडाण्याची आहे. थोड्याशा पैशांसाठी आम्ही असे आरोप कसे करू. जेवढी फीस येथे भरली त्यापेक्षा अधिक पैसा मी रूम आणि मेसमध्ये खर्च केला आहे. संस्थेने आम्हाला खोटे ठरवण्याआधी स्वत:च्या कारभाराचा विचार करावा. प्रियंका गवई, त्रस्त विद्यार्थिनी