आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारूनिर्मितीला परवाना द्या, मृत्यू टळतील, खा. रामदास आठवले यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्या गोष्टी बंद करता येत नाहीत अशांना रीतसर परवानगी दिली पाहिजे. मालवण येथे विषारी दारूने १०४ लोकांचा बळी गेला. मिश्रण करताना गडबड झाली. मात्र, तेथे त्यांना रीतसर परवाना दिला तर असे होणार नाही. पोलिसांना देण्यात येणाऱ्या हप्त्याची करोडो रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होईल. त्यामुळे मृत्यू टाळले जाऊ शकतील, अशा शब्दांत रिपाइंचे नेते तथा खासदार रामदास आठवले यांनी गावठी दारूनिर्मितीला अधिकृत करण्याची मागणी केली.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पोलिसांनी ठरवले तर दारूच काय, काहीही बंद होऊ शकते. पण त्यांना हप्ते हवे असतात. त्यामुळे ते कारवाई करत नाहीत. तेव्हा दारूबंदीची मागणी करण्याऐवजी त्यांना रीतसर परवाने देण्यात यावेत. सध्या हप्त्याच्या रूपाने करोडो रुपये पोलिसांच्या खिशात जातात. परवानगी दिली तर ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जाईल.
देशी तसेच विदेशी दारूमुळे ज्या पद्धतीने पैसे शासनाला मिळतात त्याच पद्धतीने गावठी दारूच्या निर्मितीतूनही पैसे मिळतील, असेही आठवले म्हणाले. दारूचे अड्डे बंद करण्यासाठी महिलांनी आंदोलन करण्याची गरज असून त्यासाठी मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...