आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Three Thousand Crores Rupee, Divisional Commissioner Proposal

मराठवाड्यासाठी तीन हजार कोटी, विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावावर पथकाचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील ४३ लाख शेतक-यांना २१०० कोटी रुपये रोखीने देण्यात यावेत, तसेच पाणीपुरवठा योजना, चाराटंचाईवर मात, शेततळ्यांसाठी ९०० कोटी असे किमान ३ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी विभागीय आयुक्तांनी पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडे केली आहे. ही मदत तात्पुरत्या स्वरूपात राहणार आहे.

पाणीटंचाई मिटवण्यासाठी आठही जिल्ह्यांत दरवर्षी प्रत्येकी ५०० शेततळी, तेवढेच साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यासाठी केंद्राने निधी द्यावा, कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे लावण्याचा एककलमी कार्यक्रम असावा, असे या प्रस्तावात म्हटले आहे. प्रस्ताव चांगला असल्याचे सांगत सकारात्मक विचार करण्याचे संकेत पथकाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रस्ताव असा
*शेतक-यांना रोख मदत- २१०० कोटी
*पाणीपुरवठा योजना दुरुस्ती- ३०० कोटी
*चारा उत्पादन २५० कोटी
*शेततळ्यांच्या प्लास्टिकसाठी ३५० कोटी

इतर मागण्या
*प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ५०० शेततळी
*दरवर्षी ५०० सिमेंट साखळी बंधारे
*कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजांची मोहीम
(कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणीच आडत नाही)

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यात केंद्राच्या पथकांनी सोमवारी औरंगाबाद, जालना,लातूर उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील शेतात जाऊन पाहणी केली.