आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: कन्यादानानंतर किडनीदान; मुलीचे कुंकू वाचवण्यासाठी जावयास दिली किडनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनीदात्या मंदाबाई शेळके - Divya Marathi
किडनीदात्या मंदाबाई शेळके
गारज- अाधुनिकीकरणाच्या युगात जेथे नातेसंबंध कमकुवत होत असताना यातील दुरावाही वाढला असून अशातही महिलेने कन्यादानानंतर जावयास किडनीदान करून समाजासमोर नातेसंबंधांचा एक आदर्श ठेवला आहे. वैजापूर येथील एका महिलेने आपल्या मुलीचे कुंकू वाचवण्यासाठी जावयास किडनी दान केली असून नुकतीच एमजीएम रुग्णालयात दि. रोजी ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून रुग्ण सुखरूप आहे. 

मोलमजुरी करणाऱ्या रामहरी सोनवणे (२८, रा. बहिरगाव, ता. कन्नड) यांचा विवाह गारज येथील सुनील शेळके यांची मुलगी वैशाली हिच्याशी २००७ मध्ये झाला. शेतकरी असलेले रामहरी यांना दोन मुले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना उलट्या, चक्कर येणे, अपचन होणे अशा शारीरिक व्याधींनी ते ग्रासले होते. त्यांनी आयुर्वेदिक उपचार केले, परंतु काहीही फरक पडला नाही. त्यांनी अखेर एमजीएम गाठून तपासण्या केल्या. तेव्हा त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे डॉक्टरांनी निदान केले. त्यानंतर या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगरच कोसळला. 

उपचारासाठी त्यांनी वडिलोपार्जित शेती विक्रीची तयारी केली. तसेच रामहरीच्या आई भावाने किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यांची किडनी जुळत नव्हती. तेव्हा आता किडनी कोण देणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा रामहरी यांच्या सासू मंदाबाई शेळके (४७) यांनी मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपली किडनी देण्याची तयारी दर्शवली. डॉक्टरांनी तपासणी करून किडनी मॅच होत असल्याचे निदान केले. दि. मार्च रोजी एमजीएम रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचे एमजीएमचे डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

ग्रामीणभागात शिरकाव इजिप्तच्याअल-मिनिया प्रांतात आढळणारा हा रोग मराठवाड्यातील ग्रामीण भागातही शिरकाव असून पाच वर्षांत या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. उन्हात काम करणे, अतिश्रम यापासून सीकेयूचा धोका आहे. अधिक श्रमाचे काम केल्याने किडनीवर ताण येतो कालांतराने ती निकामी होते. रासायनिक खते, फवारणीची कीटकनाशके, दूषित पाणीही यास कारणीभूत आहे. 

त्यांच्या सुखात सुख 
दोन लहान नातू मुलीच्या सुखासाठी आम्ही हा निर्णय घेतला. यासाठी राजीव गांधी योजनेतून दीड लाख रुपये मदत झाली. मुलगी, नातू, जावई हेच आमच्यासाठी सर्वकाही आहे. त्यांच्या सुखातच आमचे सुख आहे. 
- सुनील शेळके, रुग्णाचे सासरे 
बातम्या आणखी आहेत...