आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कापडी पिशव्या भेट देत केली वटपौर्णिमा साजरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात आणि वाळूज परिसरात मंगळवारी जून रोजी वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वस्त्र, आभूषणे परिधान करत महिलांनी वटवृक्षाची पूजा केली. "सात जन्मी हाच पती मिळू दे' अशी कामना केली. एकमेकींना हळद-कुंकू लावून ओटी भरली.
पर्यावरणाचे हित लक्षात घेऊन कापडी पिशव्या वापरण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी ब्राह्मण महिला मंचतर्फे समर्थनगरातील काळाराम मंदिरात कापडी पिशव्यांचे वाटप करून सण साजरा केला.
कडक उन्हात महिलांनी वटपौर्णिमेचा मुहूर्त साधला. नोकरदार आणि गृहिणींची पूजेसाठी सकाळपासून तयारी सुरू होती. पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चारासह सर्वांनी वटवृक्षाचे पूजन केल्यानंतर हळदी-कुंकू लावत उखाणे घेतले. ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांनी महिलांना कापडी पिशव्या भेट दिल्या. विशेष म्हणजे पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांना प्राधान्य द्या, असा आग्रहदेखील त्यांनी केला. या सर्व पिशव्या कुलकर्णी यांनी स्वत: तयार केल्या होत्या.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांपासून त्या हा उपक्रम राबवत आहेत. पाणी बचत, वृक्षारोपण, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर याची सुरुवात आपण स्वत:पासूनच करायला हवी, असेही त्यांनी सर्वांना पटवून दिले. या वेळी मंचच्या सचिव सुषमा पाठक, जनसंपर्क अधिकारी कला बोरामणीकर, जयश्री चौबे, वंदना खंडाळकर, नंदिनी ओपळकर यांची उपस्थिती होती.
पाणी बचतीवर जूनला कार्यक्रम : मंचच्यावतीने पाणी बचतीचे महत्त्व वेगवेगळ्या गोष्टींतून पटवून देण्यासाठी जून रोजी सायंकाळी वाजता एंजल्स पॅराडाइज स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रोजच्या वापरातून पाणी बचतीच्या टिप्स देण्यात येणार आहेत.
स्वत: लावलेल्या वटवृक्षाचे पूजन
चार वर्षांपूर्वी एन- येथील सारा गार्डन वसाहतीमध्ये महिलांनी एकत्र येऊन वटवृक्षाची लागवड केली. आज स्वत: लावलेल्या वृक्षाचे मनोभावे पूजन केले. या वेळी सोसायटीच्या सर्व सदस्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या. सोसायटीचा हा छोटेखानी सोहळा संस्कृतीची जपणूक करणारा ठरला. स्वाती जाधव यांच्यासह ३५ महिलांची या वेळी उपस्थिती होती. उपलब्ध जागेत पर्यावरणाला हातभार लावण्याच्या दृष्टीने महिलांनी टाकलेले एक पाऊल त्यांच्या जागरूकतेचा परिचय देणारे आहे.