आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएम बियाण्यांचे फील्ड ट्रायल नकोच!, जमिनीचा पोत घसरतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हल्ली पीक कोणतेही असो, त्यात जनुकीय सुधारित (जीएम) वाणांचाच बोलबाला आहे. कमी खर्च आणि कमी वेळेत अधिक उत्पादन देणा-या बियाण्यांच्या अनेक नव्या जाती अहोरात्र संशोधनातून विकसित करण्यात आल्या. मात्र, हे जीएम बियाणे जमिनीचा पोत घालवत आहेत, असाही एक मतप्रवाह आधुनिक काळात निर्माण झाला. यातून जीएम वाणांना विरोध करणारा एक वर्ग पुढे आला, पण अशा जीएम वाणांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही.
जैवतंत्रज्ञान नियामक संस्थेने (जीईएसी : जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रूव्हल कमिटी) काही जीएम पिकांच्या शेतीतील प्रत्यक्ष चाचणीस (क्षेत्रीय परीक्षण किंवा फील्ड ट्रायल) परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत काही संघटनांनी विरोध केला आहे.
पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन म्हणणे मांडल्यानंतर अशा चाचण्यांवर बंदी घालण्यात आल्याचा दावा संघटनांनी केला. मात्र, अद्याप केंद्र सरकारने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.

संसदेतही आवाज
संघप्रणीत संघटनांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने हा विषय गेल्या शुक्रवारी संसदेत उपस्थित केला. बीटी कॉटनसारख्या बियाण्यांमुळेच महाराष्‍ट्रात शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असल्याची टीका काँग्रेसचे दिग्विजयसिंह यांनी केली. याच पक्षाच्या विजयालक्ष्मी साधो यांनी जीएम पिकांना लागणारे प्रचंड पाणी आणि जमिनीचा कमी होत जाणारा कस याकडे लक्ष वेधले.

प्रयोगशाळेत नेमका जन्म कसा ?
आपल्या अपेक्षेनुसार रोपट्याच्या जनुकीय संरचनेत बदल केला जातो. अर्थात गुणवत्ता वाढीसाठी एक किंवा अधिक जनुके रोपट्याच्या मूळ संरचनेत समाविष्ट केली जातात. त्यासाठी प्रतिजैविकांचा वापर केला जातो. एकदा समाधानकारक रोपटे तयार झाल्यानंतरच सरकारकडे त्याचा परवानगीसाठी प्रस्ताव पाठवला जातो.

भारतातील सद्य:स्थिती
2002 बीटी कॉटनला भारतात मंजुरी. सध्या केवळ व्यावसायिक पातळीवर पिकवण्याची परवानगी असणारे एकमेव उत्पादन.
2006 सर्वोच्च न्यायालयात जीएम पिकांच्या विरोधात जनहित याचिका दाखल.
2010 केंद्र सरकारची बीटी वांग्यांच्या व्यावसायिक उत्पादनाला बंदी.
वास्तविक क्षेत्रीय परीक्षणासाठी राज्य सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य.
2013 सर्वोच्च न्यायालयाकडून जीएम उत्पादनांच्या क्षेत्रीय परीक्षणासंबंधी समितीची स्थापना. अद्याप अहवाल आलेला नाही.

गरज का? : कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला की तो नियंत्रणात आणणे कठीण होते. हाच प्रकार वांग्याच्या पिकात फळमाशीच्या बाबतीत घडतो. फळमाशीमुळे वांग्याचे 20 ते 80 टक्के नुकसान होऊ शकते. म्हणूनच बीटी कॉटनचे महत्त्व वाढले आणि आता बीटी वांग्याचाही बोलबाला आहे.

बदलले टोमॅटो
जनुकीय बदल करून पहिल्यांदा 1983 मध्ये टोमॅटोची निर्मिती झाली. अमेरिकेत त्याच्या मार्केटिंगसाठी परवानगी देण्यात आली. 1990 च्या दशकाच्या प्रारंभी त्याच्या वापरास अनेक देशांनी हिरवा कंदील दाखवला.

गोल्डन राइसने पोषण मूल्य वाढले
संशोधकांनी 2000 मध्ये गोल्डन राइसची निर्मिती केली. हे मोठे यश ठरले. तांदळाच्या या वाणात पोषण मूल्ये वाढवण्यात यश मिळाले.

उत्पादनात अमेरिका अव्वल : जीएम उत्पादनात अमेरिका जगात अग्रस्थानी आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत जीएम तंत्राच्या मक्याचे 85 टक्के, सोयाबीन 91 टक्के, कपाशी 88 टक्के एवढे उत्पादन घेण्यात आले आहे.

बीटी वांग्याचा वांधा
शेजारील बांग्लादेशमध्ये बीटी वांग्याला व्यावसायिक उत्पादनासाठी परवानगी. भारतात सर्वाधिक वांगी उत्पादन पश्चिम बंगालमध्ये.

बीटी वांग्याला विरोध का ? : ही वांगी कीटकनाशकापेक्षाही घातक असल्याची भीती.
कारणे : देशी वाणाच्या वांग्यावर साधारणपणे 30 वेळा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. ते अप्रत्यक्षपणे शरीरात जाते. परंतु जीएम तंत्राने तयार करण्यात आलेल्या बीटी वांग्याच्या उत्पादनादरम्यान कीटकनाशकांची गरज नसते. कारण जनुकीय बदलात हे तंत्र थेट बियांच्या निर्मितीमध्येच वापरण्यात आल्याने वांगी खाल्ल्यानंतर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

बीटी म्हणजे काय?
बॅसिलस थुरिनजिनॅसिस नावाचा जिवाणू. हा जिवाणू बोंडअळीच्या लाळेत मिसळला की अळीचा नायनाट होतो. बीटी कॉटनमुळे मराठवाडा व विदर्भात कापूस उत्पादन प्रचंड वाढले.

समर्थन कोणत्या मुद्द्यावर ?
०जीएम उत्पादने जगभरात घेतली जातात. टोमॅटो (चीन), पपई (अमेरिका, चीन), मका (16 देशांत) व भारतात कपाशी यशस्वी. त्याचा उत्पादन किंवा आरोग्यावर परिणाम नाही.
० 2013 मध्ये भारतात 1 कोटी 10 लाख हेक्टर क्षेत्रावर बीटी कपाशी लागवड. जगात चौथ्या क्रमांकाचे कपाशी उत्पादन.

कोणत्या देशांचा विरोध ?
ऑस्ट्रिया, जर्मनी, ग्रीक.
नेमका कशाला ? : फील्ड ट्रायल, व्यावसायिक लागवड.
या पातळीवर परीक्षण गरजेचे : जैवविविधता,
सूक्ष्म कीटक किंवा इतर प्राण्यांवरील परिणाम.

सरकारची भूमिका
प्रकाश जावडेकर (पर्यावरणमंत्री)
जीएम वाणांच्या थेट शेतीतील चाचण्यांवर असलेली बंदी अद्याप उठवण्यात आलेली नाही.
राधामोहन सिंह (कृषिमंत्री)
कुणी आक्षेप घेतला हे महत्त्वाचे नाही. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पर्यावरण व वन मंत्रालयांचीही भूमिका यात महत्त्वाची आहे.

मुख्य आक्षेप
पर्यावरण, जमिनीवर प्रतिकूल परिणाम, मानवी आरोग्यालाही धोका.
146 प्रकारच्या विविध जीएम कृषी उत्पादनांची सध्या निर्मिती (अमेरिकेत). कपाशी, फुले, मका, बटाटा, सोयाबीन, शुगर बीट इत्यादी.
युरोपीय देशांत दहा वर्षांपूर्वीच
जीएम उत्पादनांसाठी युरोपियन संघटनेने सदस्य देशांना दहा वर्षांपूर्वीच परवानगी दिली होती.