आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणूक, आज मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकांच्या निवडीसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गंगापूर तालुक्यातील १३, ९०० ऊसउत्पादक सभासदांकरिता मतदानासाठी ३५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सकाळी ते वाजेदरम्यान होईल. यात प्रत्येक मतदाराला मतपत्रिकांवर २० ठसे मारण्याचा अधिकार असणार आहे. २१ वा प्रतिनिधी सहकारी सोसायट्यांमधून निवडून द्यावयाचा आहे. त्यासाठी गंगापूर येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारसंघात ७२ मतदार असणार आहे. गटातून निवडून द्यावयाच्या १५ उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असून महिला राखीवमधील निवडावयाच्या दोन उमेदवारांसाठी गुलाबी रंगाची, ओबीसीसाठी पिवळ्या रंगाची मतपत्रिका, एस.सी.एस.टी प्रवर्गासाठी हिरव्या रंगाची तर विमुक्त भटक्या प्रवर्गातील उमेदवार निवडीसाठी निळ्या रंगाची मतपत्रिका राहणार आहे.
मतदानकेंद्रांची नावे : जामगावजि.प. प्रशाला खोली क्र.१ २, ममदापूर बगडी जि.प. प्रशाला ममदापूर, नेवरगाव हैबतपूर जि.प. प्रशाला खोली क्र. २, वाहेगाव वरखेड जि.प. प्रशाला वरखेड, मुद्देशवाडगाव हकिकतपूर, आलमगिरपूर, सिद्धपूर, संजरपूर, फाजलपूर, जाखमाथा जि.प. प्रशाला मुद्देशवाडगाव, रांजणगाव नरहरी अकोलीवाडगाव जि.प. प्रशाला रांजणगाव, मांजरी माउली पिंपरी शिंगी जि.प. प्रशाला मांजरी, काटेपिंपळगाव, अमिनाबाद, खडकवाघलगाव, झोडेगाव जि.प. प्रशाला काटेपिंपळगाव.मालुंजा भालगाव, सिरजगाव आदी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...