आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी महामंडळात अतिरिक्त कार्यभाराचा महापूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सक्षम अधिकारी उपलब्ध असतानाही ऐन दुष्काळात गोदावरी पाटबंधारे महामंडळात वजनदार पदांचा अतिरिक्त कार्यभार मर्जीतील अधिकाऱ्यांना देण्यात आला अाहे. एकाच अधिकाऱ्याकडे अधीक्षक अभियंता हे तांत्रिक पद तर त्याच अधिकाऱ्याकडे कॅफोचा पदभार देण्यात आला आहे. यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये असंतोष पसरला अाहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंंडळात अधिकाऱ्यांचे लॉबिंग आहे. गटातटात महामंंडळाचे अधिकारी विभागले गेल्याने याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या कामावर होत आहे. पावसाळ्यात मराठवाड्यातील ८१४ धरणांची देखभाल करणे, गोदावरी आराखडा समितीसमोर दीड महिन्यात सादर करणे, जायकवाडीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे, प्रगतीवर असलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करणे, पूर नियंत्रणासाठी आवश्यक तपास करणे अशी महत्त्वाची कामे अतिरिक्त पदभारांमुळे लांबणीवर पडली आहेत. घोटाळे करायचे आपणच, चौकशी अधिकारी व्हायचे आपणच आणि निकाली अधिकारीही अापणच अशा तीन भूमिकेत एकच अधिकारी असल्याने न्यायाची भूमिका कोण करणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

मुख्यदहा पदांचा अतिरिक्त पदभार : सध्यामराठवाड्यात प्यायला पाणी नसल्याने सर्वजण चिंतेत आहे. मात्र, गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही देणे-घेणे नाही. माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे, मला अधिकार नाहीत असे उत्तर देऊन टाळाटाळ केली जाते. महामंडळाचे कार्यकारी संचालक सी.ए. बिराजदार दीर्घ रजेवर गेल्याने त्यांचा पदभार वाल्मीचे मुख्य अभियंता अशोक ननावरे यांच्याकडे आहे. ते वाल्मीतूनच कार्यकारी संचालकपदाचा पदभार हाकत आहेत. दुष्काळात गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पदोन्नत्या रखडल्या
महामंडळातील अभियंत्यांच्या पदोन्नत्या रखडल्याने नवीन पदे भरली जात नाहीत. सर्व अधिकार मंत्र्यांकडे असल्याने रिक्त पदांचा भार कनिष्ठांकडे सोपवण्यात आला आहे. अडचणी येतात तरीही मार्ग काढतो.
- प्रशांत संत, सहा. अधीक्षक अभियंता

पद मूळ अधिकारी अतिरक्त कार्यभार
कार्यकारी संचालक सी.ए. बिराजदार अशोक ननावरे, मुख्य अभियंता वाल्मी
मुख्यअभियंता जलसंपदा ३१डिसेंबर निवृत्त बी.डी. तोंडे, अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद
मु.अभियंता प्रशासक कडा रिक्तम. की. पोफळे, अधीक्षक अभियंता, कडा
मु.अभियंता उ. म. जलसंपदा रिक्तव्ही . जी. राजपूत, मुख्य अभि. तापी, जळगाव
अ.अभि. पाटबंधारे महा. औ.बाद सु.ह. खरात डी.व्ही मुसळे, कार्यकारी अभियंता
कॅफो,मुख्य लेखाअधिकारी, रिक्तएस.पी. पैलवाड, अधीक्षक अभियंता, गोदावरीमहामंडळ, औरंगाबाद

कार्यकारी अभियंता ल.पा. औ.बाद रिक्तआर.पी. काळे, कार्यकारी अभियंता
सहा.मुख्य अभियंता, कडा रिक्तजे.एस. महेर, सहा. मुख्य अभियंता ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार
उपकार्य.अभि., ल. पा. विभाग रिक्तएम.सी. सय्यद, शाखा अभियंता
कार्य.अभियंता, गोदावरी महा. रिक्तएस. जी. सुलाखे, उपअभियंता
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...