आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Godavari Marathwada Irrigation Development Corporation,Latest News In Divya Marathi

रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सिंचन भवनावर होणारा सव्वा लाखाचा खर्च वाचला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ (सिंचन भवन) कार्यालयाच्या 20413 स्क्वेअर मीटर परिसरात भव्य इमारती आहेत. या इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी या विभागाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. त्यामुळे विहिरीची पाणीपातळी दोन फुटाने वाढली आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्यावर अडीच लाख रुपये खर्च होत होता. हा खर्च निम्म्याने घटला असल्याची माहिती शाखा अभियंता व्ही. व्ही. शेवतेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे.
पाण्याचा उपसा अधिक व जलपुनर्भरण अत्यल्प होत आहे. यामुळे भूर्गभातील पाणीपातळी 200 ते 300 फुटांपर्यंत खालावली आहे. पाणीपातळीत सुधारणेसाठी शासनाने इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सिंचन विभागाचा वाटा महत्त्वाचा आहे.
पाण्याची गरज पूर्ण
या विभागाने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले की नाही याची ‘दिव्य मराठी’ च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे इमारतीच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवण्यात येत असल्याचे दिसून आले. विहिरीची जलपातळीही दोन फुटांनी उंचावली आहे. यामुळे टँकरवर होणारा खर्च 1.25 लाख खर्च वाचला आहे. उद्यान व वापरण्यासाठीच्या पाण्याची गरज भागत असल्याचे शेवतेकरांनी सांगितले.
असे केले हार्वेस्टिंग
छतावर पडणारे पाणी पाइपद्वारे हौदापर्यंत नेले आहे. 3 बाय 3 चे दोन हौद तयार करण्यात आले आहेत. विहिरीजवळच हे हौद आहेत. तेथून विहिरीच्या सभोवती हे पाणी जमिनीत मुरावे यासाठी विटा व बारीक वाळू टाकण्यात आली. हौदातून विटा व वाळूमध्ये पाणी सोडले जाते व ते पाणी भूगर्भात जिरवले जात आहे. सिंचन भवनाचे क्षेत्रफळ 20423 स्क्वेअर मीटर आहे.