आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदावरी ऊर्ध्व खोऱ्याचे त्रिभाजन होणार नाहीच, तीनऐवजी एकच खोरे ठेवण्याचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोदावरी खोऱ्याचे विभाजन केल्यास समन्यायी पाणी वाटप होऊच शकणार नाही. परिणामी मराठवाड्याचे वाळवंट हाेईल अशी चर्चा करीत तज्ज्ञ समितीने प्रस्तावित केलेला त्रिभाजनाचा प्रस्ताव रद्द केला. गोदावरी उर्ध्व खोऱ्यात मुळा, प्रवरा व गोदावरी मिळून एकच खोरे राहील असा आदेश देत एका महिन्यात सर्व ते बदल करण्याची सूचना समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी दिले व तशी नोंद इतिवृत्तात घेतली.

गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखडा अंतिम करण्याच्या दृष्टीने स्थापन केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या उपस्थितीत २७ मे २०१६ रोजी मुंबईत बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला खंड एक व दोन मध्ये सादर करण्यात आलेल्या जल आराखड्यावर चर्चा करण्यात आली. निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनी अभ्यास करून तयार केलेला चुकीचा जलआराखडा बरोबर असल्याचे भासविण्यासाठी त्रिभाजनाचा डाव मांडला होता. मात्र, अध्यक्ष बक्षी यांनी चर्चा करून होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली. त्रिभाजन होता कामा नये असे आदेश देऊन त्या प्रकारची नोंद इतिवृत्तात घेतली.

काय आहे प्रकरण
चितळे सिंचन आयोग १९९९ आणि आंतरराज्य लवाद यानुसार गोदावरी खोऱ्याचे २५ उपखाेरे मंजूर आहेत . गोदावरी एकात्मिक जलआराखडयाच्या संबधित सेवानिवृत्त आधिकाऱ्यांनी अचानक अधिकार कक्षा नसताना ३० उपखाेरे एका रात्रीतून करुन टाकले. मराठवाड्यात १२ व विर्दभात १८ अशी विभागणी केली. याचा फटका जायकवाडी धरण आणि पर्यायाने मराठवाड्याला बसणार आहे.त्र्यंबकेश्वरच्या उगमापासून पैठण येथील जायकवाडी धरणापर्यंत एकच उर्ध्व गोदावरी उपखोरे मंजूर असताना प्रवरा उपखोरे, मुळा उपखोरे व उर्ध्व गोदावरी उपखोरे असे तीन उपखोरे करून जायकवाडीला समन्यायी पध्दतीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा घाट जलआराखड्याने घातला होता.
बातम्या आणखी आहेत...