आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेणुकामातेची भारतातील एकमेव वात्सल्यरूप मूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माहूरची रेणुकामाता नेहमी तांदळा(मुख) रुपातच सर्वत्र दिसते. मात्र औरंगाबादपासून ३५ किमीवर गाढेजळगावच्या डोंगरात श्री रेणुकामातेची संपूर्ण मूर्ती आहे. मांडी घालून बाळाला स्तनपान करणाऱ्या आईचे वात्सल्यरुप यात प्रकट होते. रेणुकामातेचे देशात एकमेव असलेले हे ठिकाण प्रसिध्दीपासून दूर राहिले. महाराष्ट्रात साडेतीन पीठांच्या रुपांच्या देवी आहेत. माहूरची रेणुकादेवी तांदळा (मुख) रुपात आहे. पंरतु ७५० वर्षांपासून औरंगाबाद-जालना रोडवरील गाढेजळगावातील डोंगरात ही रेणुकामाता पूर्ण मूर्तीरुपात आहे. करमाडच्या पुढे दोन किलोमीटरवर गाढेजळगावची कमान दिसते. गावाजवळ घनदाट जंगलात एका कपारीत माता रुपात स्वयंभू मूर्ती ७५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून विराजमान आहे.
असल्याचे गावकरी सांगतात.

औरंगजेब मंदिरापर्यंत आला
औरंगजेब अनेक देवस्थानांची महती आेळखून होते. दूतामार्फत त्यांनी एकदा देवीला मुद्दाम न चालणारा नैवेद्य पाठवला. पूजाऱ्यांनी तो दूर ठेवण्यास सांगून त्यावर तीर्थ शिंपडले. नैवेद्य उघडताच ताटात फुले व दूध दिसले. ते पाहून बादशहाने गोसावी घराण्याला जहागिरी (सुमारे ७५० एकर) प्रदान केली. आजही गावात गोसावी घराण्याला जहागिरदार म्हणून मान आहे.

गादीची परंपरा
विठानंदन यांच्या घराण्यात संत ज्ञानेश्वरांनी गादी परंपरा घालून दिली. यात विठारेणुकानंदन, वेल्हाळ रेणुकानंदन, मुरहर रेणुकानंदन, गणेश रेणुकानंदन व पाचवे मुकुंद रेणुकानंदन. ही गादी आजही सुरू आहे. यातील विजयकुमार गोसावी म्हणजे मुरहर रेणुकानंदन यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्व कहाणी ‘दिव्य मराठी’ला सांगितली.

७५० वर्षांपेक्षा जुना इतिहास
गाढे जळगावचे ग्रामस्थ सांगतात, संत ज्ञानेश्वर या देवीच्या दर्शनाला येऊन गेल्याचे अनेक दाखले पोथ्यामध्ये आहेत. डोंगरामागे गोलटगाव नावाचे गाव आहे. तेथील विठारेणुकानंदन गोसावी हे सत्पुरुष रोज पहाटे चालत गाढे जळगावच्या रेणुकामातेच्या मंदिरात येत. एके दिवशी रेणुकामातेने त्यांना दर्शन दिले व शिळा रुपात ती स्थापापन्न झाली. याशिवाय विठारेणुकानंदन यांना साक्षात्कार देऊन प्रकट झालेली एकलहरा देवी व या मंदिरासमोर झालेल्या यज्ञातून प्रकट झालेली पार्वती आणि महादेव अशी दोन्ही रुपे असलेली अर्धनारी नटेश्वराच्या रुपातील गोलटगाव येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली मूर्ती ही पंचक्रोशितील तिन्ही स्थाने रेणुकादेवीची आहेत. या तिन्ही बहिणी असल्याची आख्यायिका आहे.
अजूनही गावकरी सांगतात. एकलहरा देवीच्या मंदिरात तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्तेच देवीची प्राणप्रतिष्ठा झाली. विठारेणुकानंदन हे ज्ञानेश्वरांपेक्षा ९ वर्षांनी मोठे होते. असाही उल्लेख आख्ययिकेत आहे.

सातशे वर्षांची परंपरा सुरू
अर्धनारीनेटेश्वराच्या रुपातील देवीची मूर्ती एका जुन्या लाकडी मंदिरात पूजली जाते. गाढेजळगावला देवीसमोर यज्ञ झाल्यावरच गोलटगावातील घरातील देवीसमोर यज्ञ होतो. गाढेजळगावची देवी ही देशातील पहिली श्री रेणुकीची पुर्ण आकारातील मूर्ती आहे.
विजयकुमार गोसावी, पिठाधिश्वर, आई आदि पुरष संस्थान ,गोलटगाव
मुक्कामास येतो...
आम्ही या देवीचे पुजारी आहोत. मी निवृत्त शिक्षक असून दरवर्षी नवरात्रात गाढेजळगावातील डोंगरात मुक्कामास येऊन सेवा करतो. आता मुलगा चार्टड अकाऊंटंट होतोय तोही दर मंगळवारी देवीची पुजा करून जातो. भारतात असे रेणुकेचे रूप कोठेच नाही.
आत्माराम जोशी, पुजारी गाढे जळगाव संस्थान